Friday, May 3, 2024
Homeराज्यAkola Loksabha | भकास अकोल्याचा विकास कोण करणार?…विकास फक्त सोशल मीडियावरच…

Akola Loksabha | भकास अकोल्याचा विकास कोण करणार?…विकास फक्त सोशल मीडियावरच…

Share

Akola Loksabha : अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढत आहे, उमेदवारही मतदारांना आश्वासनांचे गाजर देवून मीच निवडून येणारं असे स्वतःच तर्क काढत आहेत, एवढच काय ज्याला स्वत:च्या घरात कोणीही विचारत नाही असा व्यक्ती सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांना विचारत आहे अकोल्याच्या खासदार कोण?..आणि स्वत:च खाली कमेंट करून आपल्या उमेदवारांचे नाव टाकून इतरही मित्रांना कॉल करून आपल्या उमेदवाराचे नाव लिहायला सांगताहेत. बर याचं आयुष्य दुसऱ्याची राजकारणाच्या पुढे पुढे करून सतरंज्या उचलण्यात गेलं याला अजिबात आपल्या शहराची किंवा गावाची अजिबात काळजी नाही. फक्त राजकारण्यांचा चमचा म्हणून ओळख आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर येथील जनता गेल्या काही वर्षात अकोला येण्याजाण्यासाठी नरकयातना भोगल्या आहे. ज्या कामाचं कालावधी दोन वर्ष असतो त्या कामाला तब्बल ६ वर्ष होऊनही पूर्ण होत नाहीत. अकोट अकोला रोड गेल्या ८वर्षापासून पूर्ण झाला नाही .आणि उमेदवार अकोटकरांना कोणत्या कामाच्या भरवश्यावर मत मागणार. सत्तेत असलेले प्रतिनिधी आधीच्या प्रतिनिधींनी केलेल्या चांगल्या कामाचं श्रेय घ्यायला अजिबात मागेपुढे पाहत नाही. मूर्तिजापूर तालुकयातील शेतकऱ्यांसाठी तीन सिंचनाचे मोठे प्रकल्प तेव्हाचे आमदार तुकाराम भाऊ यांनी आणले होते मात्र तेही अपूर्णच. मूर्तिजापूर मतदार संघात एकही काम भाजप च्याआमदाराने केलं नाही ज्याचं कौतुक करण्यासारखं आहे. जिल्ह्यात ज्यानं नाव होईल एकही काम सत्ताधाऱ्यांचे सद्यस्थितीत दिसत नाही मात्र भक्तांना दिसते.

अकोल्याच्या एकही नेता नाही ज्याचं कौतुक करण्यासारखं काम आहे, जो-तो आपली पोळी शेकून मोकळै होतो. विशेष म्हणजे अकोल्यात विरोधक एकही पॉवरफुल नव्हते त्यामुळे सत्ताधारी मोकाट झाले होते.मात्र आता एका उमेदवारांमुळे अकोल्यात विरोधकांची ताकद वाढली आहे. एवढच काय तर चक्क संघाच्या मोठ्या व्यकीला सुद्धा वाईट वागणूक देतात आणि संघाचे कार्यकर्ते म्हणतात भाऊ तुम आगे बढो…यांना आपल्या माणसाची बेइज्जती कबूल आहे पण भाऊच पाहिजे, असा समज काही कार्यकर्त्यांचा आहे मग विकासच विचारू नका..

जिल्ह्यातील तरुण नोकरी मिळत नसल्याने व शेतकरी सध्यास्थितीत सोयाबिन आणि कपसाला भाव नसल्यामुळे अडचणीत आहे. मात्र यावर अंधभक्त त्यांना हिंदू धर्माचे डोज देवून शांत करतात, शांत करणार शेतकरीच असतो पण भाऊच कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख. असे लोक असतांना या जिल्ह्याला ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही. त्यामूळे अंधभक्तांच्या बहकाव्यात येऊन परत ‘वही फुल लाया हू’ असं म्हणत असलेल्यांचा भविष्यात नक्कीच कपाळमोक्ष होणार. जिल्ह्यातील सर्वच माल आपल्या घरात असला पाहिजे असं वाटत असलेल्या एका शक्तीशाली नेत्याची दादागिरी आणखी वाढत या जिल्ह्याचं आणखी वाटोळं होणार अशी चर्चा सध्या अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. म्हणून असाच असाच उमेदवार निवडा जो सभगृहात तुमचे प्रश्न मांडू शकते सभागृहात बसून मोबाइल पाहणारा उमेदवार पाठवू नका…बघा आणि विचार करा… शेवटी निर्णय तुमचा आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: