Monday, December 11, 2023
Homeगुन्हेगारीकार दुचाकीमध्ये अपघात एक मृत एक जखमी…तुमसर मार्गावरील बोरी शिरपुर शिवारातील घटना

कार दुचाकीमध्ये अपघात एक मृत एक जखमी…तुमसर मार्गावरील बोरी शिरपुर शिवारातील घटना

Spread the love

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी)

रामटेक तालुक्यातील महादूला येथील दोन तरुण हिरो मोटार क्र MH40 CL 6441 ने गावाकडे परत येत असतांना तुमसर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या ब्ल्यू रंगाच्या मारुती बेलोना कार क्र MH49 AE 2463 ने निष्काळजीपणे कार चालवून बोरी शिरपूर शिवारातील हॉटेल राजमहल रिसॉर्ट समोर जोरदार धडक दिली.

ज्यात विजय रमेश बागडे(25 वर्ष)व अक्षय हिरामण सिंदराम ह्यांना जबर मार लागला .त्यातच विजय बागडे याचा उपचारादरम्यान मेडिकल कॉलेज नागपूर येथे मृत्यू झाला तर जखमी अक्षयवर उपचार सुरू आहेत.सदर अपघाताची नोंद पोलीस स्टेशन रामटेक येथे केली असून सदर प्रकरणाचा तपास रामटेक पोलिस करीत आहे.


Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: