Thursday, April 25, 2024
HomeSocial Trendingसेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यानी गडचिरोली ते अहेरी आठ तास सायकलने केला प्रवास...

सेवानिवृत्त महसूल कर्मचाऱ्यानी गडचिरोली ते अहेरी आठ तास सायकलने केला प्रवास…

Share

अहेरी – मिलिंद खोंड

श्रीरामाचे व बजरंग बलीचे नामस्मरण करून अहेरी निवासी 77 वर्षीय असलेले सेवानिवृत्त चतुर्थ कर्मचारी सर्वेश्वर बूच्चया कारेंगूलवार यांनी गडचिरोली ते अहेरी असे 120 किलोमीटरचे अंतर सायकलने प्रवास करून नवतरुणांना एक अनोखा संदेश दिल्याने त्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ व स्थानिक विठ्ठल रुक्माई विवाह सोहळा समितीद्वारे विनोद भोसले यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास योजनेअंतर्गत ७५ वर्षाच्या वरिष्ठ नागरिकांना एसटी प्रवास बस मोफत असतानाही गडचिरोली येथून नवीन सायकल विकत घेऊन प्रवास केला.

सर्वेश्वर यांचा दैनंदिन जीवनमान सकाळी ब्रम्ह मुहूर्तापासून पुष्प संकलन, देवपूजा, विठ्ठल रुक्माई मंदिरात भजन व इतर धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घेणे वृक्ष लागवड व संवर्धन छंद जोपासात असून तहसील कार्यालय अहेरी इथे दोन वडाचे वृक्ष त्यांचे लागवडीचे प्रतीक पन्नास वर्षानंतर जिवंत आहेत.

महसूल विभागातून 2008 साली चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालेले सर्वेश्वर सध्या जेष्ठ नागरिक कल्याण मंडळ व स्थानिक विठ्ठल रुक्माई विवाह सोहळा समितीच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक कार्यात हिरीरिणे शारीरिक व मानसिकरित्या सहभाग घेण्यास तत्पर असतात गडचिरोली येथील नवीन सायकलीच्या खरेदीनंतर वाहतूक मोटार सर्विस मधून सायकलीला पोंहचविण्यात विलंब लागेल असे चौकशी नतंर कळल्यामूळे ईश्वर शक्ती चे नाव स्मरण करीत सायकलने 120 किलोमीटरचा आठ तास प्रवास केला.

गडचिरोली ते आष्टी हे 70 किलोमीटरचे अंतर कापण्यास चार तास लागले तर उलटपक्षी तेवढाच वेळ आष्टी ते अहेरी हे अवघे चाळीस किलोमीटर अंतर कापण्यास लागल्याने रस्त्यांच्या अवस्थेबद्दल संबंधित अधिकारी व पोकळ आश्वासने देणाऱ्या राजकीय पुढार्‍यांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महसूल सेवेत कार्यरत असताना एक वेळा जिल्हास्तरावर फास्ट वाकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक तर दोन वेळा ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळातर्फे आयोजित मॅरॅथॉन स्पर्धेत सुद्धा प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले होते.

कबड्डी, व्हॉलीबॉल व थ्रोबाल मध्ये आवड असणाऱ्या या व्यक्तीचे कौतुक व स्वागत दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा जेष्ठ नागरिक कल्याण मंडळाचे सल्लागार विनोद भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

यावेळी सचिव अशोक निकुरे, रमेश कस्तुरवार, विनायक दोंतुलवार,अशोक आईंचवार, रमेश सडमेक,भाऊराव सिडाम, बबलू सडमेक व विठ्ठल रुक्माई विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष उमेश गुप्ता  उपस्थित होते.


Share
Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: