Sunday, May 5, 2024
Homeग्रामीणलाखपुरी येथील घराला आग लागुन लाखोचे नुकसान...सुदैवाने ४ जिव वाचले…

लाखपुरी येथील घराला आग लागुन लाखोचे नुकसान…सुदैवाने ४ जिव वाचले…

Share

  • राजु नवघरे , शुभागी नवघरे , दिक्षीका नवघरे ,आराध्या नवघरे हे बचावलेले कुटुंबातील सदस्य…
  • देवतारी त्याला कोण मारी….

वुत्तसेंवा – अतुल नवघरे
लाखपुरी ‘१२ , मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील राजु सिताराम नवघरे –वय -४१ वर्षे , व त्याची पत्नी शुभागी नवघरे वय -३२ वर्षे व मुलगी दिक्षीका नवघरे – १२ वर्ष मुलगी आराध्या नवघरे -१० वर्ष हे चौघेही दि. ११-०८-२०२३ रोजी रात्री -७.३० च्या दरम्यान घरामध्ये होते . शुभागी नवघरे ह्या गॅस वर चहा करत असतांना गॅस नी अचानक पेट घेतला असता शुभागी यांनी आरडा ओरडा केल्याने आजुबाजुचे नागरिकांनी तिथे धाव घेतली आग विजविण्या खुप मेहनत घेतली आग ऐवढी भिशन होती की आगित फ्रिज , टिव्ही , इलेक्ट्रीक फिटीग साहीत्य वायरिंग , पेटी , कपाट , दिवान , अन्नधान्य , शालेय पुस्तक , सर्व महत्वाचे कागदपत्रे , घरातील कपडे , घरात ठेवलेले २० हजार , औषधी , दवाखान्यातील फाईल इ साहीत्य जळाले. राजु सिताराम नवघरे हे कैन्सर ने आजारी असुन सदर कुटुब खुप गरिब आहे . गावातील नागरिकांनी व सरपंच राजप्रसाद कैथवास यांनी सतर्कमुळे राजु सिताराम नवघरे –वय -४१ वर्षे , व त्याची पत्नी शुभागी नवघरे वय -३२ वर्षे व मुलगी दिक्षीका नवघरे – १२ वर्ष व आराध्या नवघरे -१० वर्ष या चौघांना जिव वाचवण्यास गावकरी लोकांना यश आले. आज दि. १२-०२ – २०२३ रोजी लाखपुरी चे मंडळ अधिकारी जाधव यांनी राजु नवघरे यांच्या घरी येवुन घराचा पंचानामा केला. यावेळी सरपंच राजप्रसाद कैथवास , डिगांबर उघडे , तोताराम देशमुख , दत्ता जामनिक , पत्रकार अतुल नवघरे सह गावातील नागरिक उपस्थित होते. सदर कुटुबांला शासनाने मदत द्यावी अशी लाखपुरी येथील नागरिकांनकडुन होत आहे.

लाखपुरी येथील राजु नवघरे यांच्या घराला आग लागुन लाखोचे नुकसान झाले . गावक-यांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने ४ जिव वाचवण्यात यश आले आहे . परंन्तु अद्याप पर्यंत शासन स्तरावरुन सदर कुटुंबाला मदत मिळाली नाही.तरि शासनाने सदर कुटुबांला आर्थिक मदत तात्काळ द्यावी …
( सौ. मिनल नवघरे ( माजी पं. सदस्या लाखपुरी )

रात्री -७.३० च्या दरम्यान घरामध्ये मी व माझे पती राजु नवघरे व मुलगी दिक्षीका नवघरे व मुलगी आराध्या नवघरे घरामध्ये होतो व मी गॅस वर चहा करत असतांना गॅस अचानक पेट घेतला .मी आरडा ओरडा केल्याने सरपंच व गावातील नागरिक धावुन आल्याने आम्ही वाचलो माझे पती आजारी आहे त्यात ऐवढे नुकसान झाल्याने सरकार नी आम्हाला मदत द्यावी .
( शुभागी नवघरे )

सदर कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाकिची असुन राजु नवघरे यांना कैन्सर असल्यामुळे पत्नी व २ लहान मुली यांचे पालन पोषन ते करतात त्यात असे असमानी नुकसाना झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरि शासनाने व आमदार साहेबांनी सदर कुटुबांला मदत करावी.
सरपंच लाखपुरी ( राजप्रसाद कैथवास )


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: