Saturday, May 11, 2024
Homeराज्यगंगाभवनम येथे आदिवासी गौरव दिनाचा भव्य कार्यक्रम संपन्न...

गंगाभवनम येथे आदिवासी गौरव दिनाचा भव्य कार्यक्रम संपन्न…

Share

शबरी आवास योजनेंतर्गत रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासींना १० हजार घरकुल मंजुर…

कुवारा भिवसेन येथे साकारणार गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र

रामटेक – राजु कापसे

आज दिनांक 7 ऑगस्ट ला शहरातील गंगाभवनम सभागृहामध्ये आदिवासी गौरव दिनाच्या औचीत्याने भव्य अशा कार्यक्रम पार पडला यात आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना दहा हजार घरकुलांची तथा गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र ची भेट दिली.

तेव्हा या दरम्यानच आमदार अशी जैसवाल्यांनी माझ्या मतदारसंघातील नागरिक जे जे मागतील तेथे मी त्यांना देईल असे उद्गार काढत संबोधन केले. दुपारी १ च्या सुमारास दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गोंडी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर मंचावरील मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला.

रामटेक विधानसभा क्षेत्रातील अनेक नागरिक व विशेषतः आदिवासी नागरिक घरकुला पासून वंचित होते मागणी मोठी व शासनाकडून त्याची पूर्तता फार कमी प्रमाणात करण्यात येत होती तेव्हा नागरिकांनी आमदार जयस्वाल यांच्यापुढे सदर समस्या ठेवली ही समस्या हेरून आमदार जयस्वाल यांनी शासन दरबारी वरच्या पातळीवर पाठ सातत्याने पाठपुरावा केला.

त्याला यश आले व शबरी योजने अंतर्गत तब्बल दहा हजार घरकुले मंजूर झाली पैकी पाच हजार घरकुल आता व उर्वरित पाच हजार घरकुले येत्या काही दिवसात मिळणार आहे. आज या कार्यक्रम प्रसंगी आमदार जयस्वाल यांनी लॅपटॉप मध्ये बटन दाबून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वळता करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली.

तसेच कुवारा भिवसेन येथे तब्बल १७ एकर जागेत गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र साकारणार असल्याची माहिती कार्यक्रमादरम्यान आमदार जयस्वाल यांनी सांगीतले. यावेळी उपस्थितांमध्ये आमदार आशिष जयस्वाल, एस.डी.ओ. वंदना सवरंगपते, जि.प. सदस्य संजय झाडे,

सतीश डोंगरे, पं.स.सभापती संजय नेवारे, बिडीओ जयसिंग जाधव, माजी जि.प. सदस्य नरेश धोपटे, शोभा झाडे, पंचायत समीती पदाधिकारी – अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक वर्ग, सरपंच गणेश चौधरी, सरपंच उर्मिला खुडसाव,

सरपंच उमेश भांडारकर, माजी सरपंच आशिष मासुरकर, तालुक्यातील सरपंच मंडळी तथा आदिवासी बांधव तथा नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: