Tuesday, May 7, 2024
Homeराज्यनरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफ पथक दाखल...

नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफ पथक दाखल…

Share

  • आरएफओ अनिल भगत यांच्या नेतृत्वाखाली करणार महिनाभर गस्त
  • एसआरपीएफ, वनविभाग, एसटीपीएफ तथा प्राथमिक प्रतिसाद दल मिळून ६३ जणांचा ताफा लागला कामी
  • राजकीयांच्या संबंधित गावात भेटीगाठी

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील रामटेक ते हिवरा बाजार मार्गावर असलेल्या महाराजपुर जवळील नहाबी शेत शिवारात नुकतेच दिनांक ५ नोव्हेंबरला गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या नंदू लक्ष्मण सलैय्या रा. नहाबी या 65 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून नरडीचा घोट घेत त्याच्या शरीराचे अक्षरशः भक्षण केल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातच नव्हे तर संपुर्ण तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

सध्यास्थितीत त्या वाघाचे वास्तव्य याच परिसरात असल्याची विश्वसनीय माहिती असून यामुळे त्या परिसरातील नागरिक अद्यापही दहशतीमध्ये आहे. काही शेतकरी तर ऐन शेतपिकांच्या हंगामावर शेतावर जाणे टाळत असल्याची माहिती संबंधीत गावातील नागरिकांकडुन प्राप्त झाली आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने एक पाऊल पुढे सरकवत आज दि. १५ नोव्हेंबरला सरळ एसआरपीएफ च्या पथकालाच गस्तीसाठी पाचारण केले आहे. आज सकाळी ११.३० दरम्यान हे पथक तालुक्याच्या मुसेवाडी गावात दाखल झाले. दरम्यान येथे प्रामुख्याने उपस्थित असलेले रामटेकचे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अनिल भगत यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की सीआरपीएफ च्या पथकाला येथे आज बोलविण्यात आलेले असून पूर्ण महिनाभर ते येथे मुक्कामी राहून गस्त घालणार आहेत तसेच गस्त घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये सीआरपीएफ चे 26 जवान,

वन विभागाचे १२ गार्ड , एसटीपीएफ चे ५ जवान तसेच परीसरातील ४ गावांमध्ये प्राथमिक प्रतिसाद दल तयार करण्यात आले असुन चार गावातील प्रत्येकी ५ असे २० नागरीक असा एकुण ६३ जनांचे पथक करण्यात आलेले असून ते तब्बल महिनाभर महाराजपुर, नहाबी, गुडेगाव तथा मुसेवाडी या परिसरात गस्त घालणार आहेत यादरम्यान संबंधित नरभक्षक वाघ दिसून आल्यास त्याला जंगल परिसराकडे हाकलण्याचे काम हे पथक करणार असल्याची माहिती यावेळी नवनियुक्त आरएफओ अनिल भगत यांनी दिली.

राजकीयांच्या संबंधित गावात भेटीगाठी
नहाबी तथा आसपासच्या गाव परिसरात वाघाने घातलेल्या धुमाकूळमुळे नागरिक दहशतीमध्ये असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक काही राजकीय नेत्यांनी गावभेटी करून तेथील नागरिकांना हिम्मतीचा आसरा दिला. त्यामध्ये आमदार आशिष जयस्वाल यांनी नहाबी गावामध्ये जाऊन तथा वन विभागाच्या वरिष्ठ तथा स्थानिक अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून ग्रामस्थांना वाघापासून संरक्षण मिळावे या हेतूने काही उपाययोजना सांगितल्या तसेच उपस्थित वन अधिकाऱ्यांना योग्य उपाययोजना करण्यास सांगितले.

त्याचप्रमाणे उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांनी सुद्धा ग्रामस्थांची भेट घेत त्यांना हिम्मत देत विविध उपाययोजना सांगितल्या. त्याचप्रमाणे भाजपाचे राजेश ठाकरे यांनी वनविभागाला निवेदन देत संबंधित स्थळी रेस्क्यू टीम पाठवून ग्रामस्थांना संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: