Monday, December 11, 2023
Homeगुन्हेगारी१४ वर्षीय मुलीला छेडछाड केल्याने कागल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल...

१४ वर्षीय मुलीला छेडछाड केल्याने कागल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…

Spread the love

कागल ; प्रतिनिधी…

कागल येथे एका 14 वर्षीय शाळकरी मुलीला छेडछाड करून धमकी दिल्याप्रकरणी एका इसमावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कागल येथील विराज सिटी येथे राहत असणाऱ्या 14 वर्षीय शाळकरी मुलीला एक इसम वाईट नजरेने बघून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून छेडछाड करत होता.

एवढयावर ही न थांबता त्या इसमाने सदर मुलीला येथील न्यु बिग मार्ट मधून काही सामान घरी घेऊन जात असताना त्या मुलीला I Love You, I need you असे म्हणाला .
यावर मुलीने नकार दिल्याने ही गोष्ट बाहेर कुणालाही सांगितली तर मी तुला वयक्तिक काहीही करु शकतो अशी धमकी देऊन इन्सटाग्राम अंकाऊटवर I had told you not to tell anyone but you did now its your time असा एक संदेश पाठवला.

यानंतर सदर त्या शाळकरी मुलीने कागल पोलीस ठाण्यात त्या इसमाविरोधात फिर्याद दिली.त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अधिनियम 2012 कलम 12 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला…


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: