Saturday, May 11, 2024
Homeगुन्हेगारीसांगलीतील वानलेसवाडी हायस्कूलमधील ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा - उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल...

सांगलीतील वानलेसवाडी हायस्कूलमधील ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा – उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील वानलेसवाडी हायस्कूल मधील 34 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विषबाधा झाली असून या सर्व विद्यार्थ्यांना सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

दरम्यान सकाळी साडेदहाच्या दरम्यान हौसाबाई रुपनर या बचत गटाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा सेवन केल्यानंतर या हायस्कूल मधील 34 विद्यार्थ्यांना मळमळणे पोटदुखी आणि उलट्या असा त्रास झाल्याने शाळेतील शिक्षकांनी तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं .या सर्व विद्यार्थ्यांवर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान सदर अन्नाचे नमुने शासकीय प्रयोगशाळा मध्ये पाठवण्यात आले असून यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन उपायुक्त सुकुमार चौगुले यांनी दिलीय.प्राथमिक शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली या संदर्भात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशार आहे यावेळी गायकवाड यांनी दिला आहे यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सविता मदने,सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी तारळेकर यांनीही विद्यार्थ्यांना भेट घेऊन चौकशी केली.

दरम्यान सदर ठेकेदाराने शहरातील अठरा शाळांतील ४००५ विद्यार्थ्यांना हा पोषण आहार पुरवला असल्याचे हौसाबाई रुपनर महिला बचत गटाचे मॅनेजर धनाजी रुपनर यांनी सांगितले आहे. सदर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून, कोणाच्याही जीवितास धोका नाही. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांमार्फत मिळाली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: