Monday, December 11, 2023
HomeMarathi News Todayआकोट पालीकेचे २७% ओबीसी आरक्षण घोषीत...९ जागांपैकी ५ जागा महिलांकरिता. ३५ सदस्यीय...

आकोट पालीकेचे २७% ओबीसी आरक्षण घोषीत…९ जागांपैकी ५ जागा महिलांकरिता. ३५ सदस्यीय पालीकेत १८ महिला तर १७ पुरुष…महिलांचे आधिक्य….

Spread the love

संजय आठवले, आकोट

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा ईम्पिरीकल डाटा मंजूर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे सूचनेनुसार आकोट पालीका निवडणूकीचे पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण ३५ सदस्यीय पालीकेत २७ % म्हणजे ९ जागा ओबीसींकरिता आरक्षित करण्यात आल्या असुन त्यातील ५ जागा महिलाकरिता राखण्यात आल्या आहेत. ह्या आरक्षणामूळे पालीकेमध्ये १८ महिला तर १७ पूरुष नगरसेवक राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा ईम्पिरिकल डाटा मंजूर केल्यानंतर संपूर्ण शहरात ओबीसी आरक्षणाची ऊत्सुकता शिगेला पोचली होती. अखेर दि. २८ जूलै रोजी हे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. आकोट पालीकेत एकूण ३५ सदस्य राहणार आहेत. त्यात सर्वसाधारण गटात ११, सर्वसाधारण महिला गटात १०, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटात ४, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला गटात ५, अनुसुचीत जाती गटात २, अनुसुचित जाती महिला गटात २, तर अनुसुचित जमाती महिला गटात १ असे बलाबल राहणार आहे.

प्रभाग क्र. १, २, ३ ,४, ६, ७, ८, ११, १२, १३, १५ हे प्रभाग सर्वसाधारण गटाकरिता आहेत. प्रभाग क्र. १, ३, ५, ७, ९, १०,.११, १४, १६, १७ हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी असतील. प्रभाग क्र, ५, १०, १४, १७ हे प्रभाग नामाप्रसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्र. २, ७, ८, १२, १३ हे प्रभाग नामाप्र महिलांकरिता ठेवले आहेत.

या पूर्वीच काढलेल्या आरक्षणानुसार प्रभाग क्र. ९, १६ हे अनुसुचित जाती तर प्रभाग क्र. ४, १५ हे प्रभाग अनुसुचित महिलांसाठी राखण्यात आले आहेत. क्र. ६ हा अनुसुचित जमाती महिलेकरीता आरक्षित केला गेला आहे.

ह्या आरक्षण सोडतीकरिता पालीकेचे प्रभारी प्रशासक तथा अकोला येथिल उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ घुगे, पालीका मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, पालीका प्रशासन अधिकारी सागर पहूरकर हे ऊपस्थित होते. संजय बेलूरकर, ऋषिकेश तायडे तायडे यानी या कामी सहकार्य केले. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या स्वरा राउत हीच्या हस्ते काढण्यात आल्या.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: