Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजनझी युवा सम्राट अजय देहाडे यांचा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम...

झी युवा सम्राट अजय देहाडे यांचा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम…

Share

पातूर – निशांत गवई

१ जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झी युवा सम्राट अजय देहाडे यांचा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.

पातूर शहरात भिम सेना संघटनेच्या वतीने १९ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता नगर परिषद नियोजित खेळाचे मैदान,अकोला-बाळापूर बायपास रोडवर भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त झी युवा सम्राट अजय देहाडे यांचा भव्य भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन व प्रमुख उपस्थितीत वंचित बहूजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर राहणार असून पातूर तालुक्यातील तमाम जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भीमगीतांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: