Thursday, May 9, 2024
Homeराज्यमिरज मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा...

मिरज मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते सुशांत खाडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे…

Share

सांगली – ज्योती मोरे

भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता मिरज हायस्कूलच्या भव्यपटांगणावर दहीहंडी चे आयोजन करण्यात आलंय.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवराज अष्टक प्रेमदायक अवधूत गांधी आळंदीकर आणि सहकार्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासात सांगणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलंय.एक लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस सदर दहीहंडीसाठी ठेवण्यात आलंय.

दरम्यान आपली संस्कृती आणि परंपरा यांची जपणूक करण्यासाठी तसेच तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते सुशांत खाडे यांनी सांगितलंय.

या दहीहंडीसाठी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे,खासदार संजय पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते मकरंद देशपांडे,भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग,भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील,आदिंसह इतर अनेक मान्यवर आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: