Monday, December 11, 2023
Homeराज्यपातूर येथे अपघातात युवक जागीच ठार...

पातूर येथे अपघातात युवक जागीच ठार…

Spread the love

पातूर – निशांत गवई

पातूर – बाळापूर मार्गवर असलेल्या संभाजी चौकात एका ट्रकने पैदल चालत असलेल्या युवकास उडविले अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सदर अपघात हा आज दिनांक 13 ऑक्टोबर चे दुपारी 1:30 वाजता चे दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि बाळापूर वरून येत असलेला ट्रक क्रमांक GJ -18-AX4167 हा हैद्राबाद येथे जात असतांना शहरातील संभाजी चौकात एक वेडसर व्यक्तीस जबरदस्त धडक दिली या धडकेत अनोळखी युवकाचा जागीच मृत्यू झाला असून हा व्यक्ती प्रत्यक्षदर्शी नि वेडसर असल्याचि माहिती पातूर पोलिसांना दिली असून घटनेचि माहिती मिळताच पातूर चे ठाणेदार किशोर शेळके, सहा. ठाणेदार गजानन तडसे, सहा. ठाणेदार गजानन पोटे आदी.

सह घटनास्थळ वर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रण मध्ये आणली ट्रक चालक शेख मुसा केसर भाई सेता वय 55रा. मानावडर जिल्हा जुनागड गुजरात यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध कलम 279,304, भादवी सह कलम 134अ, ब, मो. वा. का. प्रमाणे कारवाई करण्यात आली असून अपघात घडल्या नंतर त्या ठिकाणी दुले खान, स्वप्नील सुरवाडे मंगेश गाडगे, अमर ढोणे, राहुल भगत, विशाल तेजवाल, सै. इरफान, शे. रफिक शे. रशीद, अन्वर खान आदी. नि पातूर पोलिसांना मदतीला धावून आले.

अपघाता पूर्वी सदर युवक हा शहरातील चौकात फिरताना दिसून आला असून हा वेडसर असलेल्या अवस्थेत फिरताना दिसला हा अपघात एवढा भीषण होता कि या युवका चा मेंदू बाहेर पडून छिन्नविछीन्न होऊन रस्त्यावर पडला मृतक युवका चे उजव्या हातावर गणेश व रिंकू असे गोंदलेले असून कुणाच्या परिचित असेल त्यांनी पातूर पोलीस स्टेशनं ला माहिती देण्या चे आवाहन पातूर पोलिसांनी केले आहे.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: