Thursday, May 2, 2024
Homeगुन्हेगारीयवतमाळ | तहसीलदार कुणाल झाल्टे व राजेंद्रगिर गोसावी यांनी चक्क तक्रारदार अमोल...

यवतमाळ | तहसीलदार कुणाल झाल्टे व राजेंद्रगिर गोसावी यांनी चक्क तक्रारदार अमोल कोमावारला संपवण्याची घेतली होती सुपारी…

Share

बहुचर्चित अतिशय गंभीर प्रकरणाचा सनसनीत खुलासा.

यवतमाळ (प्रतिनिधी) बहुचर्चित व सर्वसामान्य माणसांच्या समजण्याच्याअव्याख्या बाहेरचे प्रकरण वर्धा- यवतमाळ -नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांचा गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणासंबंधात अतिशय सणसणी खेज खुलासा झाला आहे. या करोडो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणातून सुटण्यासाठी चक्क कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ व निवृत्त जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्रगीर गोसावी यांनीच तक्रारदार ,पत्रकार ,विसल ब्लोअर तसेच नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट चे राज्यसचिव अमोल कोमावार यांना जिवानिशी मारण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी व प्रकरण दडपून टाकण्यासाठी करोडो रुपयांची सुपारी घेतल्याचा सणसणी खेज खुलासा आज एका तक्रारी द्वारे करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या विकासाचे काम चालू असताना या विकास कामाचे मुख्य कंत्राटदार आर .भारत रेड्डी हे अर्थवर्क चे काम करीत असून हर्षिता कन्स्ट्रक्शन हैदराबाद होते परंतु आर भरत रेड्डी यांनी त्यांना मिळालेल्या कामातून थोडा थोडा भाग हा उपकंत्राटदार यांना देऊन विकास कामाचे काम करीत होते परंतु यामध्ये बऱ्याच अनियमितता असल्याचे तसेच विनापरवाना गौण खनिज विकत असल्याचे तक्रारदार अमोल कोमावार यांच्या निदर्शनास आल्यावर त्या संबंधात जील्हा खणीकर्म अधिकारी राजेंद्र गिर गोसावी यांना सूचना देण्यात आली त्याच बरोबर मे., जून व जुलै २०२० या तीन महिन्यात अवैध गौण खनिजाचे साधारणत:तब्बल वीस हजार ट्रक जिल्हाखणीकर्म अधिकारी गोसावी यांच्या निदर्शनास जाय मोक्यवर आणून दिले परंतु गोसावी यांनी त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केलेली नव्हती. त्यामुळे या संदर्भात विचारणा केल्यास उडवा उडीचे उत्तर खणीकर्म अधिकारी गोसावी यांनी दिले तसेच कोमावार यांना यानंतर या कार्यालयात बिलकुल यायचे नसल्याचे सुद्धा खडसावले त्यामुळे काहीतरी मोठा घोळ असल्याची शंका येऊन 27 /8 /2020 रोजी अमोल कोमावार यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. परंतु राजेंद्रगिर गोसावी यांनी चिडून जाऊन त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या दालनात ,पदाचा गैरवापर करून अमोल कोमावार यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत संबंधित यवतमाळ तहसीलदार, कळंब तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना या संपूर्ण प्रकरणाबाबत रीतसर तक्रारी तसेच सतत पाठपुरावा करून त्यानंतर आमरण उपोषण करून प्रकरणातील दोषी कंत्राटदार ,उप कंत्राटदार, रेल्वेचे काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी, तसेच राज्य शासनाचे दोशीअधिकारी कर्मचारी यांना दोशी असल्याबाबत पुराव्यासह वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.

परंतु एका बाजूने तक्रारदार लोकशाही मार्गाने शासकीय दप्तरी रीतसर तक्रारी करून यांची भ्रष्टाचाराची शृंखला उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्या बाजूने यातील आरोपी यांनी यांची भ्रष्टाचाराची मालिका उघडकिस येऊ नये म्हणून कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ यांनी रेल्वे उपकंत्राटदार अमित मुथा यांनी खुलेआम लाखो रुपयांचा गौण खनिज मांगीलाल शर्मा व इतरांना विकला व त्या गैरप्रकाराबाबत आदेश काढताना तक्रारदार विरुद्ध मांगीलाल शर्मा असा आदेश दिनांक 31 /5/ 2021 रोजी काढून तक्रारदार व मांगीलाल शर्मा यांच्यामध्ये वाद निर्माण करून तक्रारदारावर दडपण आणून त्याच्या जीवानीशी खेळण्याचा प्रयत्न केला. मांगीलाल शर्मा यांनी दिलेल्या जीवनाशी मारण्याच्या धमक्या, मारण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबत संबंधित पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे रीतसर तक्रारी दिलेल्या आहेत. एवढेच नाही तर अमित मुथा व राजेंद्र गीर गोसावी यांनी या भ्रष्टाचारातून पळवाट काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पकडलेल्या व केलेल्या कारवाईतील गाडीचे नंबर सुद्धा बदलविले याबाबत सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल आहेत. या सर्व प्रकारासाठी कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ व राजेंद्र गीर गोसावी निवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी मुख्य कंत्राटदार आर .भरत रेड्डी , ईश्वर, चंद्रशेखर ,भास्कर ,अमित मुथा व इतर उपकंत्राटदार तसेच रेल्वे कर्मचारी यांचेकडून प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदाराला संपविण्यासाठी यांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून करोड रुपयाच्या मोठया रक्कमेची सुपारी घेतली.

त्यामुळे कुणाल झाल्टे, राजेंद्र गिर गोसावी, अमित मुथा व यांचे इतर संबंधित भ्रष्टाचार प्रकरणातील सहकारी यांच्यापासून संभाव्य धोका विचारात घेऊन विद्यमान जिल्हा न्यायालय यवतमाळ यांचे समक्ष तक्रारदार अमोल कोमावार यांनी प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखल केलेले आहेत. या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणात गेल्या दोन ते तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करून त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या समक्ष सुनावणी घेतल्यावर सुद्धा यातील दोषी अधिकारी कंत्राटदार उपकंत्राटदार यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई जाणीवपूर्वक केल्या गेलेली नाही. या उलट दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केल्या गेला.

उपलोकायुक्त कार्यालय, मुंबई ,नॅशनल ग्रीन ट्रीबुनल ,विभागीय आयुक्त ,अँटी करप्शन, उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पांढरकवडा पोलीस स्टेशन यवतमाळ यांच्या मार्फत सध्या संबंधित दोषीं अधिकाऱ्यांवर प्रकरणाची चौकशी चालू असताना यांना खोटे अहवाल सादर करणे ,तेच ते उत्तरे दाखल करणे ,असे भयंकर गंभीर स्वरूपाचे गुन्हे यांच्या करवी झालेले आहेत आणि होतही आहेत .परंतु संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे भ्रष्ट मंत्री सुद्धा यामध्ये सामील असल्यामुळे यांची राजरोसपणे खुलेआम “आमचं कोणीच वाकड करू शकत नाही” या भावनेने शासन आणि प्रशासनासोबत नियम कायदे कानून यांना न जुमानता आपल्या मर्जीप्रमाणे बिनधास्त वागताना दिसत आहे.

राजेंद्र गिर गोसावी यांच्या टीमने केलेल्या बालाजी पाईप फॅक्टरी येथील पंचनामे बाबत अजूनही संभ्रमच आहे. त्याचबरोबर यासंदर्भात लोकायुक्त ला पाठविलेला अहवाल त्याहीपेक्षा संभ्रमात टाकणारा आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पकडलेल्या गौण खनिजाच्या ट्रक बाबत व त्याच्या चौकशी बाबत त्याचबरोबर या संबंधातील चौकशीसाठी माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी दिलेल्या पत्रावर सुद्धा कुठल्याही पद्धतीची चौकशी न करता खासदारांच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवलेली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केल्यास कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ यांनी तक्रारदाराला आपल्या दालनात बोलावून वाटेल तशी अतिशय अश्लील ,घाणेरड्या भाषेत आणि जिवे मारण्याच्या धमकी सह शिवीगाळ केली याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय यांना तक्रारी मार्फत कळविले आहे.परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यावर धृतराष्ट्राची भूमिका घेतली. कारण इथून तिथपर्यंत सर्वांना आपले खिसे गरम करण्यासाठी मोबदला मिळाला असल्यामुळे कोणीही कारवाई करण्यास तयार नाही.

अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर विचार करण्याची बाब ही आहे की वर्धा- यवतमाळ -नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या 29 किलोमीटरच्या कामांमध्ये शिरपूर नदी कळंब तालुका इथून तर यवतमाळ इथपर्यंत अनेक अनियमितता आढळून आलेल्या आहेत त्यामध्ये अवैध सागवानाची कत्तल , अवैध वृक्षतोड,अवैध आणि अनियमित उत्खनन, अनेक परवानग्यामध्ये अनियमितत्ता, बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये गौण खनिज विनापरवाना टाकून दिले त्याचबरोबर ऐतिहासिक पुरातन मंदिरे तोडफोड केली , भूजल सर्वेक्षणानुसार सुद्धा अनियमितता, वन विभागाच्या परवानग्या , रेल्वे उत्खननातून निघालेले मोठे मोठे दगड यांना गिट्टी क्रेशर वर क्रश करून खुल्या बाजारात विकणे असे बरीच प्रकरने घडलेली असून या संबंधित विभागांना बऱ्याचदा तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. एवढेच नाही तर कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ हे बऱ्याच गावगुंड रेती तस्करांसोबत तोंडीभागीदारीत व्यवसाय सुद्धा करताना कठोर चौकशी अंती निष्पन्न होईल हे निश्चित. कुणाल झाल्टे यांच्याबाबत दर महिन्याला मोठी रोख रक्कम किंवा आलटून पालटून सोन्याचे बिस्किट नियोजित स्थळी पाठवताना च्या जबरदस्त गुप्त बातम्या परिसरातील सर्व कार्यालयाच्या गप्पा गोष्टीचा , गमतीशीर चर्चेचा मुद्दा बनलेला असल्याचे सुद्धा ऐकिवात आहे.

अतिशय गंभीर व महत्त्वाचे म्हणजे या रेल्वे उत्खननामध्ये व त्यातील पिचिंग मध्ये अनेक नियमबाह्य कामे केल्यामुळे भविष्यात रेल्वेचा जबरदस्त अपघात होण्याची व मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याचीअतिशय दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर सतत या रेल्वे मार्गाचे डागडूजी करण करून त्यावर लागणारा खर्च हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे हे अगदी निश्चित. त्यामुळे एकट्या तक्रारदारालाच नाही तर संपूर्ण भविष्यात होणाऱ्या जीवित हानीला, भयंकर अपघाताला न भरुण निघणाऱ्या नुकसानीला , होणाऱ्या संभाव्य धोक्याला या दोषी अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरून तसेच उत्खननातून केलेल्या करोडो रुपयांच्या गौण खनिजाच्या दंडाची वसुली सुद्धा याच अधिकाऱ्याच्या खाजगी संपत्तीतून वसूल करण्यात यावी व त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याबाबतचे पत्र गृहराज्यमंत्री तसेच मुख्यमंत्री तसेच पोलीस खात्याला एका तक्रारी मार्फत नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट चे राज्यसचिव अमोल कोमावार यांनी दिले. त्याचबरोबर तीन दिवसात या प्रकरणावर चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल न झाल्यास नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणाच्या पुराव्यासह , तसेच तक्रारदाराला मारण्याच्या सुपारी प्रकरणाच्या सर्व पुराव्यासहित खुलासा करून संविधान चौक नागपूर येथून गृहराज्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे नियोजन असल्याचे सुद्धा विश्वासनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: