HomeBreaking Newsयवतमाळ | महावितरणच्या सहायक अभियंत्याला शेतकऱ्याने केबल वायरने केली बेदम मारहाण...

यवतमाळ | महावितरणच्या सहायक अभियंत्याला शेतकऱ्याने केबल वायरने केली बेदम मारहाण…

Share

यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुक्यातील वीज वितरणच्या कंपनीच्या सहायक अभियंत्याला एका संतप्त शेतकऱ्याने केबल वायरने बेदम मारहाण केली आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपरी-सावित्री येथील घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. वेळेवर वीज जोडणी न केल्याने शेतकऱ्याने तात्पुरता केबल टाकून शेतात वीजजोडणी केली होती. हा प्रकार सहायक अभियंत्याच्या लक्षात आला. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या सहायक अभियंत्यावर शेतकऱ्यांने हल्ला केला. या प्रकरणी राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: