रामटेक – राजु कापसे
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त, पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्राने निसर्ग व्याख्या केंद्र, अमलतास येथे दिवस साजरा केला. यावेळी श्री. योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. नागपुर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. प्रभूनाथ शुक्ला, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. अतुल देवकर, सहाय्यक वनसंरक्षक(अशिप्रक) यांनी पेंचमध्ये वाघांसाठी घेतलेले विविध संवर्धन प्रयत्न, वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन आणि वाघांची संख्येची सद्यस्थिती यावर भर दिला.
तसेच संवर्धनातील इतर विभागांच्या भूमिकेबद्दल श्री. अजिंक्य भाटकर, मानद वन्यजीव रक्षक यांनी वाघांच्या विविध प्रजाती, मनुष्य-प्राणी संघर्ष, वन्यजीव भम्रणमार्गावर महत्त्व आणि कृषी, पाटबंधारे, एमएसईबी, पोलिस, शिक्षण अशा इतर विभागांची भूमिका याविषयी सांगितले. वन्यजीव संवर्धनात स्वयंसेवी संस्थांकडून विविध भूमिका बजावल्या जाण्यावरही त्यांनी भर दिला.

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व वन परिक्षेत्रात भाषण, निबंध लेखन, चित्रकला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वर्ल्ड वाइड फंड (WWF) द्वारे आयोजित आणि श्री अजिंक्य भटकर यांनी संयोजन केलेल्या बॅग पेंटिंग स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांनी आपल्या भाषणात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पारशिवनी व सावनेर भागातील उपजीविका विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच बफर गावातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या वनअध्यापक योजनेचीही माहिती दिली. त्यांनी जलद प्रतिसाद दल (QRT), प्राथमिक प्रतिसाद दल(PRT) आणि RRT (जलद बचाव दल) संघ, वन्यजीवांशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी समन्वय साधताना किंवा हाताळताना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची माहिती दिली.
कार्यक्रमतील प्रमुख अतिथी, श्री. योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनी व्याघ्र संवर्धन आणि व्यवस्थापनातील योगदानाबद्दल त्यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी विशेषत: पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये राबविण्यात येत असलेल्या कार्बन क्रेडिट प्रकल्पाचा आणि तोतलाडोह प्रकल्पाच्या अंतर्गत (NAFCC) एनएएफसीसीमध्ये सुरू असलेल्या इकोरिस्टोरेशनच्या कामांचा उल्लेख केला.

श्री प्रवीण बोरकुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक (A.P.I.) देवलापार, महावितरणचे श्री अजिंक्य मोहिले, श्री शिशुपाल मेश्राम एलडीओ, श्री. सुनील कुमार दमाहे, सहाय्यक अभियंता PWD यांचा पेंचमधील विविध उपक्रमांमध्ये सहाय्यक भूमिकेबद्दल सत्कार करण्यात आला. श्री अजय चुटे यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू केलेल्या वन अध्यापक उपक्रमातील त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
राष्ट्रीय आदर्श विद्यालय, नवेगाव खैरी, जयसेवा आदर्श हायस्कूल, पावनी, आणि जि.प. प्राथमिक शाळा, पोपरिया, सिल्लाई, पाथराई, सावरा येथील विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंगेश ताटे, वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व पेंच पिपरिया यांनी केले तर श्री संजय पारेकर, क्षेत्रसहाय्यक, सिल्लारी यांनी आभार मानले.
यावेळी श्री राहुल शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी चोरबाहुली, श्री अभिजित इलमकर वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार, श्री संजय मोहोड वनपरिक्षेत्र अधिकारी सालेघाट, श्री विशाल चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी पश्चिम पेंच, श्री प्रवीण लेले वनपरिक्षेत्र अधिकारी नागलवाडी (ए.नि.) उपस्थित होते. विविध कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सहकार्य केले .