Homeराज्यकाटोल येथे 'महिला प्रबोधन कार्यक्रम', सावित्रीच्या लेकींचा सन्मान...

काटोल येथे ‘महिला प्रबोधन कार्यक्रम’, सावित्रीच्या लेकींचा सन्मान…

Share

सावित्रीबाई फुले विचारमंचचे आयोजन

सोशल मीडियाचा वापर जपून करा – पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे…

नरखेड – अतुल दंढारे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच, काटोल कडून सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त ‘महिला प्रबोधन कार्यक्रम’ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य किर्तीताई लंगडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे, सावित्रीबाई फुले विचारमंच अध्यक्षा वैशाली डांगोरे, सचिव अँड.भैरवी टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे यांचा प्रशासकीय सेवेतील उत्तम कामगिरीबाबत तर कविता कांडलकर यांचा ‘सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट’ म्हणून शाल,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देतांना पूनम कोरडे म्हणाल्या, मुलींनी व महिलांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा.वैयक्तिक फोटो किंवा माहिती सोशल मीडियावर सार्वजनिक करू नये.यामुळे सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

प्रत्येक महिलांनी आधुनिकतेचे अंधानुकरण न करता संस्कृती रक्षण करावे.जर आईने आपली जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली तर नात्यांची गुंफण व्यवस्थित होऊन समाज जागृत होईल,असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात किर्तीताई लंगडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.भैरवी टेकाडे, संचालन माधवी डांगोरे तर आभार प्रदर्शन कल्पना गोमासे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोहना खरबडे,प्रतिभा भेलकर,मंगला श्रीखंडे,निलिमा पाटील,भावना पाटील,कांचन टेंभे, वैशाली श्रीखंडे,वंदना डांगोरे, आशुका टाकळखेडे,सोनाली तिजारे,लता बोढाळे,शितल चर्जन,सोनाली बोढाळे,शिल्पा बोढाळे,संध्या नेरकर, अर्चना वरोकर, जयश्री वरोकर,रजनी नेरकर, रोशनी खरळकर, सुनिता कांबळे आदींनी सहकार्य केले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: