Thursday, February 22, 2024
Homeराज्यमहिला बचत गट मार्गदर्शन आणि नोंदणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न...

महिला बचत गट मार्गदर्शन आणि नोंदणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न…

Share

आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे महिला सक्षमीकरणासाठी पाऊल

मुंबई – गणेश तळेकर

विभागातील अनेक कुटूंबीयांना सढळ हस्ते मदत करणारी ‘आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्ट’ आता महिला बचत गटांना मदत करण्यासाठी सरसावली आहे. सक्षम पारदर्शक व्यवहार असलेल्या निवडक बचतगटांना ‘आशीर्वाद’ पुढील काळात व्यवसायासाठी भक्कम मदत करणार आहे.

आर्थिक बचतीचा मुख्य गाभा असलेल्या नारीशक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘आशीर्वाद’ने सक्षम पारदर्शक महिला बचत गटांना सामूहिक उद्योगाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. त्याची सुरवात २० जानेवारी २०२४ रोजी लक्ष्मीबाई पाष्टे सभागृह, शहीद भगतसिंग मैदाना शेजारी, अभ्युदय नगर, काळाचौकी येथे करण्यात आली.

आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिला बचत गट मार्गदर्शन आणि नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन मुंबादेवी मंदिर न्यासचे व्यवस्थापक मा. हेमंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण खामकर, महेश वारंग, भिकाजी साळुंखे. प्रवीण ठाकूर तसेच आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले उपस्थित होते. याप्रसंगी हेमंत जाधव यांना महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

“विभागात सामूहिक उद्योगाचे जाळे तयार व्हावे, महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करणे. त्यासाठी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे.” असे उद्गार आशीर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले यांनी काढले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी इसरार खान, आनंद घोगळे, अरविंद घाडगे, अनिल कदम, तुषार पाटेकर, रवींद्र कदम, नवनाथ पाटील, नवनाथ गाढवे, रमेश चौबे आणि विनायक भंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: