Sunday, May 5, 2024
Homeगुन्हेगारीकागल येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार...

कागल येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार…

Share

कागल – राहुल मेस्त्री

कागल येथे अखिलेश पार्क नजीक पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात ट्रक कंटेनर वाहनाच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.16 रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कागलहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना येथील अखिलेश पार्क नजीक पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात ट्रक कंटेनर वाहनधारकांनने दुचाकी वरून जात असणाऱ्या हिरो डीलक्स (गाडी क्रमांक एम एच 09, ईडी 7492) या दुचाकी वाहनधारकाला जोराची धडक दिली असून यामध्ये शबाना जावेद मुल्ला वय 50 रा. रुई ता. हातकलंगले असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर दुचाकी चालवणारा त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.

सदर अपघात घडल्यानंतर महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळे करता महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. याबाबत कागल पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. त्याचबरोबर अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: