Monday, December 11, 2023
HomeSocial TrendingRahul Anna | जेव्हा राहुल गांधींनी रस्त्यावर डोसा बनवला आणि…व्हिडिओ व्हायरल…

Rahul Anna | जेव्हा राहुल गांधींनी रस्त्यावर डोसा बनवला आणि…व्हिडिओ व्हायरल…

Spread the love

Rahul Anna : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तेलंगणाच्या दौर्यावर आहेत त्यांनी शुक्रवारी तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर डोसा बनवला. ‘विजयभेरी यात्रे’चा भाग म्हणून काँग्रेसचे खासदार करीमनगर येथून जगतियालला रवाना झाले. वाटेत नुकापल्ली बस स्टँडवर ते थांबले आणि एका भोजनालयात गेले, तिथे त्यांनी डोसा बनवणाऱ्या एका माणसाशी बातचीत केलीय, डोसा बनवण्याबद्दल विचारलं आणि मग डोसा बनवला.

राहुल यांना डोसा बनवताना पाहून स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले. खासदारांनी डोसा बनवणाऱ्याला त्याचे उत्पन्न आणि त्याला भेडसावत असलेल्या समस्यांबद्दलही विचारले. डोसा बनवल्यानंतर राहुलने रस्त्याच्या कडेला बसून लोकांसोबत तो खाल्ला. राहुल यांनी लोकांना स्वतः बनवलेला डोसाही चाखायला लावला. यावेळी लोक खूप आनंदी दिसत होते.

यावेळी काँग्रेस नेत्याने ये-जा करणाऱ्यांशीही संवाद साधला आणि मुलांना चॉकलेटचे वाटप केले.


Spread the love
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: