Friday, May 17, 2024
HomeमनोरंजनWelcome 3 | अक्षय कुमारच्या वाढदिवशी वेलकम टू द जंगल टीझर ची...

Welcome 3 | अक्षय कुमारच्या वाढदिवशी वेलकम टू द जंगल टीझर ची झलक…

Share

न्युज डेस्क – Welcome 3 : सध्या अक्षय कुमार त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘OMG 2’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर चित्रपटाने ‘गदर 2’ आणि ‘जेलर’ची उपस्थिती असूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.

अशा परिस्थितीत चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट एन्जॉय करत आहे. यासोबतच अक्षय कुमार ‘मिशन राणीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू’साठी देखील चर्चेत आहे. काल चित्रपटाचे पोस्टर रिलीज केल्यानंतर आता अभिनेत्याच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपट चे टीझर लाँच केले आहे.

अक्षय कुमार, कतरिना कैफ स्टारर ‘वेलकम’ हा बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे, याचे लोकांमध्ये अजूनही वेड आहे. अक्षय, कतरिना तसेच नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल आणि इतर अनेक कलाकारांनी अभिनय केलेल्या या चित्रपटातील प्रत्येक दृश्याने लोकांना मनापासून हसवले. 2007, 2015 नंतर आता ‘वेलकम 3’च्या रिलीजची तयारी जोरात सुरू झाली आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्टपासून सर्व काही निश्चित झाले आहे, त्याची अधिकृत घोषणा करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अक्षय कुमारच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा मोठ्या थाटात केली जात आहे.

‘वेलकम टू द जंगल’ नावाचा ‘वेलकम 3’ हा ‘वेलकम’ फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट आहे. अक्षय कुमार, संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, परेश रावल आणि इतर अनेक कलाकार असलेला हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: