Friday, February 23, 2024
Homeराज्यवन विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरच निकाली...

वन विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरच निकाली काढू…

Share

नागपूर – शरद नागदेवे

श्री.एम.वासुदेवन व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम नागपूर यांनी स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या 3 दिवसांपूर्वी संघटनेला बैठक देऊन असलेल्या मागण्या निकाली काढून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला हा एक आदर्श निर्माण केला.

एफडीसीएम भवन अंबाझारी नागपूर येथे वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीला महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक श्री वासुदेवन साहेब यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते सदर बैठकीत संघटनेचे अध्यक्ष अजय भाऊ पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वागत करून बैठकीला सुरुवात केली.

संघटनेच्या निवेदनात असलेल्या रास्त मागण्या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत माननीय वासुदेवन यांनी चर्चा करून खालील प्रमाणे रास्त मागण्या 31 जुलै सेवानिवृत्तीपूर्वी निकाली काढण्याचे प्रयत्न करून महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन दिले.

माननीय वासुदेवन यांनी वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मंजूर करून संघटनेला वेळोवेळी सहकार्य केलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळात महामंडळात अनेक उपक्रमातून महामंडळाचे उन्नतीचे व प्रगतीचे कार्य केले आहे.

अधिकारी व कर्मचारी संघटना व प्रशासन यांच्यामध्ये नेहमीच समन्वय ठेऊन महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य वेळी न्याय दिला त्याबद्दल त्यांचे संघटने कडून आज विशेष सत्कार केला गेला तसेच महामंडळासाठी व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कायम एक आदर्श व्यक्तिमत्व राहतील अशी भावना संघटनेचे अध्यक्ष यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केली.

प्रलंबित असलेल्या मागण्या…

1 ) दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी संघटनेच्या तृतीय अधिवेशनामध्ये दिलेल्या निवेदनाचे अनुषंगाने केलेले कार्यवाही बाबत संघटनेला अवगत करण्यात यावे
सदर अधिवेशनात प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात निवेदनातील बऱ्याच मागण्या मंजूर करण्यात आलेले आहेत उर्वरित असलेल्या प्रशासना स्तरावरच्या इतर मागण्या लवकरात लवकर निकाली काढून संघटनेला अवगत करण्यात येईल

2 ) महामंडळातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2016 ते जुन 21 पर्यंतची सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम देणेबाबत..
सदर विषय शासन स्तरावर प्रलंबित आहे वेतन आयोगाची थकबाकी साठी लागणारी रक्कम देण्याची तरतूद महामंडळाकडून राखीव ठेवण्यात आलेली आहे

3) सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत

सदर विषयावर नियमाप्रमाणे लवकरच लवकर योग्य तो कार्यवाही करण्यात येईल.

4 ) महामंडळातील लेखा सहाय्यक यांना लेखापालच्या पदावर पदोन्नती देणे प्रकरणी
सदर विषय आज रोजी निकाली काढून पात्र असलेल्या लेखासहाय्यकांना पदोन्नती देण्यात आली आहे

5 ) महामंडळातील वाहनचालक ते लीपिक संवर्गात बदली धोरण शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत
सदर विषयावर शासन निर्णयाप्रमाणे योग्य ती तपासणी करून वाहन चालक यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू

6) वनपाल यांना वनक्षेत्रपालाचे पदावर पदोन्नती देणे प्रकरणी

माहे ऑगस्ट अखेर सदर विषय प्रशासनाकडून निकाली काढू असे आश्वासन दिले

7 ) नॅशनल इन्शुरन्स कंपनी मार्फत अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा देताना होणाऱ्या आडचनी बाबत

सदर विषयात संघटनेकडून अधिकारी व कर्मचारी यांना वैद्यकीय सेवा घेत असताना येणाऱ्या अडचणी बाबत लेखी स्वरूपात अवगत करावे जेणेकरून मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीला प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील

8) वैद्यकीय खर्चाच्या मासिक प्रतिपुर्ती मर्यादित वाढ प्रकरणी परिपत्रक जारी करणे बाबत
सदर विषय संचालक मंडळात ठेवण्यात आला होता संचालक मंडळाचे सभेचे कार्यवृत्तास मंजूरी मिळताच तसे आदेश पारित केले जातील

9 ) महामंडळातील लेखा सहाय्यक सवर्गासाठी पदोन्नतीचे गुणोत्तर प्रमाण 20/80 पुणे बाबत किंवा वन विभागाप्रमाणे करणेबाबत
सदर विषय संचालक मंडळात ठेवण्यात आला होता यामध्ये वन विभागाप्रमाणे कार्यप्रणाली तपासून त्याप्रमाणे पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येइल

10) नागपूर व चंद्रपूर प्रदेश मधिल रिक्त असलेली वनपालाचे पदावर वनरक्षक यांना पदोन्नती देण्यात यावी

सदर विषयात रिक्त असलेल्या पदाबाबत माहिती घेऊन संबंधित प्रदेशाचे महाव्यवस्थापक व प्रादेशिक व्यवस्थापक यांना आदेश देण्यात येतील
11) अनुकंप तत्त्वावरील रिक्त पदे भरणे बाबत
नाशिक व चंद्रपूर प्रदेशात रिक्त असलेली अनुकंप तत्वातील सर्व पदे तात्काळ भरण्याचे निर्देश देण्यात येतील

12) महामंडळात महसूल वाढीच्या दृष्टीने चंद्रपूर प्रदेशातील उत्पन्न होणाऱ्या बांबूचा 50 टक्के साठा नासिक प्रदेशासाठी राखीव ठेऊन स्थानिक शेतकऱ्यांना शेती उपयोगी बांबू विक्री केंद्र सुरु करणे बाबत.

सदर प्रकरणात योग्य तो तपास करून नाशिक प्रदेशासाठी बांबू साठा उपलब्ध करून स्थानिक शेतकऱ्यांना बांबू विक्री केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित करू

13) आलापल्ली येथील एफडीसीएम वसाहतीत कायम पावसाळ्यात पुरग्रस्त स्थिती निर्माण होत असते या ठिकाणी आधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सुरक्षित ठिकाणी नवीन ईमारत बांधकाम करणे बाबत

सदर प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून तात्काळ अहवाल बोलून अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थान तयार करण्याबाबतचे प्रस्तावित करण्यात येईल

इतर अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्या वर चर्चा करून सदर मागण्या तात्काळ निकाली काढू असे आश्वासन माननीय श्री वासुदेवन व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम यांनी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री अजय पाटील व इतर पदाधिकाऱ्यांना दिले सदर बैठकीला प्रशासनाकडून एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक श्री वासुदेवानं,मुख्य महाव्यवस्थापक श्री गौड साहेब इतर अधिकारी हजर होते सदर बैठकीत कर्मचारी संघटनेकडून संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री अजय पाटील कार्याध्यक्ष बी. बि. पाटील सरचिटणीस रमेश बलैया,

उपाध्यक्ष रवी रोटे, राहुल वाघ,सचिव अशोक तुंगीडवार ,टेमराज हरीणखेडे, सुधाकर राठोड, दिनेश आडे ईतर पदाधिकारी हजर होते सदर बैठकीला प्रशासनाकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केल्याने व प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे hii hu संघटनेचे सरचिटणीस यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: