Monday, December 11, 2023
Homeगुन्हेगारीवाशीम | पुरवठा निरीक्षक निलेश राठोड यांना ७० हजाराची लाच घेताना रंगेहात...

वाशीम | पुरवठा निरीक्षक निलेश राठोड यांना ७० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले…अमरावती ACB ची कारवाई…

Spread the love

वाशीम : वाशिमच्या तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक निलेश राठोड वय वर्ष ३३ यांना ७० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले असून शिवभोजन थाळीचे थकीत बिल लवकर काढण्यासाठी मागतली होती लाच. निलेश विठ्ठलराव राठोड या निरीक्षकासह एका खाजगी व्यक्तीला अमरावती लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून वाशिम शहर ता. जि. वाशिम येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार यांना व त्याचे मित्राला शिवभोजन थाळीचे कंत्राट मिळाले असून त्यांचे दोघांचे थकबाकीत असलेले शिवभोजन थाळीचे बिल डी एस ओ ऑफिस ला लवकर पाठविणे करिता पुरवठा विभाग येथील पुरवठा निरीक्षक श्री.राठोड तहसील कार्यालय वाशिम हे तक्रारदार यांना 80,000/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत दि. 21/11/2022 रोजी तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीवरून दि. 21/11/2022 व दि. 22/11/2022 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान श्री.निलेश राठोड यांनी तक्रारदार यांना व त्यांचे मित्र अब्दुल अकिब अब्दुल अकील, वय 25 वर्ष, धंदा – मजूरी रा. सौदागर पुरा जैन मंदिर जवळ वाशिम ता. जि. वाशिम (खाजगी ईसम). याच्या कडून प्रत्येकी 35000/- रू.असे एकुण 70,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यांनतर दि.25/11/2022 रोजी आयोजित पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे क्र. 1 यांनी सदर लाचेची रक्कम आरोपी क्र. 2 (खाजगी इसम) यांच्या मार्फ़तीने त्यांच्या कार्यालयामधे स्वीकारल्याने दोन्ही आरोपीतांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. नमूद आरोपीविरुद्ध पो.स्टे. वाशिम शहर ता. जि. वाशिम येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मार्गदर्शन –
मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

1)श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

2)श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

3) श्री संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती.
4) श्री शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती

सापळा अधिकारी – पो. नि. अमोल कडू ,ला.प्र.वी.अमरावती
कारवाई पथक –
पोलीस निरीक्षक अमोल कडू, पो. नि.योगेशकुमार दंदे,
पोना- विनोद कुंजाम,
पोशि- शैलेश कडू ,
चालक पो.उपनि. प्रदिप बारबुद्दे


Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: