Thursday, May 9, 2024
Homeराज्यसांगली मार्केट यार्डातून बीएसएनएलच्या टेलिफोन पिलर व त्यामधील केबलसह टॅग बॉक्स चोरणाऱ्या...

सांगली मार्केट यार्डातून बीएसएनएलच्या टेलिफोन पिलर व त्यामधील केबलसह टॅग बॉक्स चोरणाऱ्या दोघास विश्रामबाग पोलिसांकडून अटक…

Share

सांगली – ज्योती मोरे

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्केट यार्डातील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या टेलिफोन पिलर केबल आणि टॅग बॉक्स चोरणाऱ्या सुखदेव अशोक पवार वय 25, राहणार -वडर कॉलनी, सांगली.या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह अर्जुन हनुमंत पवार, वय वर्षे 21, राहणार -वडर गल्ली,सांगली.

या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या,त्यानुसार पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदारामार्फत या दोघांची नावे समजली, त्यानुसार सापळा रचून त्यांना वडर गल्लीतून ताब्यात घेण्यात आले. दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम,अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील,सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास मुंढे, पोलीस नाईक दरिबा बंडगर, पोलीस नाईक अतुल खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप घस्ते,पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मुलानी, सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल भावना यादव आदींनी केली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: