Monday, February 26, 2024
HomeSocial TrendingViral Video | मालकाला पाहताच शेळ्या बेहोश होण्याचे नाटक करतात…व्हिडिओ पाहून हसू...

Viral Video | मालकाला पाहताच शेळ्या बेहोश होण्याचे नाटक करतात…व्हिडिओ पाहून हसू येईल…

Share

Viral Video : टीव्हीवरची लहान लेकरांना आवडणारी कार्टून मालिका ‘शोन द शिप’ मध्ये मालक आणि शेळी मधील प्रेम दाखवणारी मालिका जुनी झाली असली तरी असाच एक बकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी खूप मजेशीर आहे. शेळ्या त्यांच्या मालकासमोर ज्या प्रकारे वागत होत्या. त्याला पाहिल्यानंतर कोणीही त्यांच्या हास्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला हिरवळ दिसत आहे, जिथे काही शेळ्या गवत चरत आहेत. दरम्यान अचानक एक ट्रक तिथे येऊन थांबतो. हा ट्रक पाहून शेळ्या गवत चरायला थांबतात, मग एक बकरी खाली पडते आणि बेशुद्ध पडण्याचे नाटक करू लागतात. हे संपूर्ण दृश्य पाहून तुम्हाला हसू फुटेल.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला आहे. @viralHog नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. यावर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे. व्हिडिओ पाहून लोकांना हसायला भाग पडेल. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, शेळ्याही माणसाप्रमाणेच विचार करतात. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, प्रत्येक जीवाला मरण्याची भीती वाटते. आणखी एका युजरने लिहिले की, हा खूप मजेदार व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: