Monday, May 27, 2024
HomeदेशViral Video | १६ फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या २ वर्षाच्या मुलाची अशी...

Viral Video | १६ फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या २ वर्षाच्या मुलाची अशी केली सुटका…

Viral Video : कर्नाटकातील इंडी तालुक्यातील लचायन गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे. 18 तास चाललेल्या प्रदीर्घ ऑपरेशननंतर मुलाची सुटका करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास बचावकार्य सुरू करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा घराजवळ खेळण्यासाठी गेला होता आणि त्यानंतर तो या बोअरवेलमध्ये पडला. मुलाचा रडण्याचा आवाज कोणीतरी ऐकून तातडीने कुटुंबीयांना माहिती दिल्याने ही बाब उघडकीस आली. 2 वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी बोअरवेलच्या समांतर खोदकाम करून 21 फूट खोल खड्डा खोदण्यात आला.

मुलाची प्रकृती कशी आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. घटनास्थळी ऑक्सिजनसह वैद्यकीय पथक तैनात असून, इंजेक्शनसह आपत्कालीन प्राथमिक उपचारही सज्ज ठेवण्यात आले आहेत. बाळाला वाचवल्यानंतर ताबडतोब इंडी येथील रुग्णालयात हलवण्यासाठी एक रुग्णवाहिकाही उभी ठेवण्यात आली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments