Thursday, May 2, 2024
Homeराज्यनागपूरला रविवारी विदर्भ गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन...

नागपूरला रविवारी विदर्भ गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन…

Share

झिंगाट फेम सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता आकाश ठोसर, सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मीनल पाचकवडे यांची विशेष उपस्थिती

अकोला – नागपुर येथील श्री जैन मेकओव्हर यांच्या तर्फे रविवारी (दि. 30) विदर्भ गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या सोहळ्यात झिंगाट फेम सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह अकोल्यातील निशा मेकओव्हर च्या संचालिका सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मीनल श्रीकांत पाचकवडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

नागपुर येथील हॉटेल रेजिंटा येथे रविवारी (30 ) सकाळी 10 वाजता आयोजित या सोहळ्यात एसजेएम अवार्ड शो अँड सेमिनारचे आयोजन सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट श्री धीरज जैन यांनी केले आहे. यावेळी विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ब्युटीशियन यांना विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे झिंगाट फेम सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता आकाश ठोसर राहणार असुन यावेळी अकोल्यातील निशा मेकओव्हर च्या संचालिका सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मीनल श्रीकांत पाचकवडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: