Thursday, May 2, 2024
Homeराज्यवीरशैव लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचाच भाग - श्री श्री श्री १००८...

वीरशैव लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचाच भाग – श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी…

Share

सांगली – ज्योती मोरे

वीरशैव धर्मातील पोटजातींचा केंद्रीय ओबीसी मध्ये सरसकट समावेश करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असून या निर्णयावर आम्ही ठाम आहोत अशी प्रतिक्रिया श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीनी आज सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय.

दरम्यान सांगली जिल्हा सकल वीरशैव लिंगायत समाज शिवबसाव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीनं तरुण भारत स्टेडियम मध्ये शिव महाकथा सोहळ्याचं आयोजन केल्याबाबत त्यांनी आयोजकांचं कौतुक करत समाधान व्यक्त केलंय.

दरम्यान वीरशैव लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग असून तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा नाही .ज्यावेळी फाळणी झाली त्याच वेळी समान नागरी कायदा आणायला हवा होता यासाठी 70 वर्षे उशिर झाला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: