Thursday, May 2, 2024
Homeसामाजिकभीमा कोरेगाव दिना निमित्त बिलोलीत विविध कार्यक्रम...

भीमा कोरेगाव दिना निमित्त बिलोलीत विविध कार्यक्रम…

Share

सुरेखा जाधव, बिलोली

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या यातील वीर योध्यांना मानवंदना देण्यात येणार असून प्रतिकात्मक विजयस्तंभाची शहरात रॅली काढण्यात येणार अन्य दोन कार्यक्रचे आयोजन केल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

एक जानेवारी १८१८ च्या भीमा कोरेगाव येथील लढ्यात वीरमरण आलेल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आज दि.१ जानेवारी रोजी बिलोली येथील संयोजन समितीच्या वतीने शौर्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजून ३० मिनीटांनी विजयस्तंभाच्या प्रतिकृतीची शहरातील आंबेडकर नगर येथून निघून समता नगर,गांधी चौक मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यन्त मिरवणूक काढण्यात येणार असून स्तंभास व शूरवीरांना मानवंदना देण्यात येणार आहे.

तर दुसऱ्या सत्रात सायंकाळी ६ वाजता लातूर जिल्ह्यातील एकुरका येथील बाल वाख्याता सुबोध एकुर्केर यांचे व्याख्यान असून त्यानंतर विकास राज यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे.या कार्यक्रमास तालुक्यातील भीम अनुयायांनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजन समितीचे बाळासाहेब लाखे यांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: