Thursday, April 25, 2024
Homeराज्यशेततळ्यातील दगडाचा स्टोन क्रेशरसाठी वापर...

शेततळ्यातील दगडाचा स्टोन क्रेशरसाठी वापर…

Share

किनवट – बुरकुलवाडी शिवारातील शेततळ्यातील दगडाला हिमायतनगर तालुक्यातील एका गिट्टीक्रेशरकडे पाय फुटले आहेत. शेततळ्यातील दगड शेतात न वापरता सर्रास गिट्टी क्रेशरला पुरवठा होत असल्याची खबर सहायक जिल्हाधिकारी मेघना कावलींना मिळाल्यावरुन त्यांनी पथकाला पाचारण करुन कारवाई करण्यास भाग पाडले.

महसूल पथकाच्या कारवाईनंतर मुंबईच्या उपायुक्तांपर्यंत धागा पोहोचला. पथकाला कारवाई न करण्यासाठी त्यांनी भ्रमनध्वनीवरुन संपर्क केला परंतू चोख कर्तव्य बजावणार्‍या पथकाने अखेर वाहन जप्तीची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. शेततळ्याची सबब पुढे करुन अवैध दगडी खदान तयार करणार्‍यांची वाढटी संख्या दिसत आहे.

अवैधधंद्यातील सज्जनांनी अवैध दगड उत्खननावर जोर दिला असलातरी महसूल पथकाने मात्र एक पोकलेन मशिन, एक टिप्पर आणि २ ट्रॅकटर्सला रंगेहात पकडून इस्लापूर पोलीसांच्या स्वाधीन केल्याचे सूत्रिंनी सांगितले.
गिट्टीक्रेशरवर जाणार्‍या दगडाच्या खदान उत्खननाचा परवाना एका ठिकाणचा आणि खदान तयार केली जाते दुसर्‍याच ठिकाणी.

परवाना एका कामासाठी आणि दगड जातो मात्र गिट्टीक्रेशरवर. कितीही शक्कल लढऊन फाॅर्म्युला कोणताही वापरला तरी यावर महसूल विभागाचा हातोडा पडला की कारवाई तर होणारच. हिमायतनगर तालुक्यातील तालुक्यातील एका शेतकर्‍याचे किनवट तालुक्यातील बुरकूलवाडी शिवारात शेतजमिन आहे.

त्या शेतकर्‍याच्या शेतात शेततळ्याचे काम चालू आहे. त्यात निघालेला दगड शेतात न वापरता कारवाईतील लोकांना दिला आहे. गिट्टीक्रेशरवर हा दगड जात असल्याची माहिती किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी मेघना कावलींना मिळाली. त्यांनी तलाठी बोधगीरे व तलाठी सकवान यांना यांच्याकडे प्रकरण सोपवले.

त्यांनी कोतवाल अमोल राठोडांना सोबत घेऊन नुकत्याच टाकलेल्या धाडीत एक पोकलॅन मशिन, एक टिप्पर व दोन ट्रॅक्टर्स रंगेहात पकडले. पकडलेल्या गाड्या इस्लापूर पोलीसांच्या ताब्यात दिल्या. कारवाईची प्रक्रिया चालू होती. अशातच महसूल पथकाकडे मुंबईच्या उपायुक्तांचा भ्रमनध्वनी धडकला. कारवाई न करण्यासाठी सांगितले मात्र पथकाने हकीकत सांगून त्यांची मागणी धुडकावली.

अवैध दगड धंद्यात पांढरपेशांचा हात असल्याचे आनेकदा पहायला मिळाले. यापुर्वी अशाच स्वरुपाची कारवाई झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. सहायक जिल्हाधिकारी कावलींनी गिट्टीक्रेशरांना पर्यावरणाचा परवाना आहे का ?, निर्धारीत खानपट्यातूनच उत्खनन व वाहतूक केली जाते का ?, वाहतूकीच्या वाहनांना जीपीएस प्रणालीचा वापर होतो का ?,

अशा अन्य बाबी तपासल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या नावाआड अवैध उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक करणार्‍यांचा परवाना गोठवण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी याही मागणीला उजाळा देण्यात आला आहे. बुरकुलवाडीतील कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचा धागा मंत्रालयापर्यंत असल्याचे स्पष्ट झाले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: