Sunday, April 28, 2024
Homeसामाजिकसांगलीतील राम मंदिर चौकात श्रीरामाचे पोस्टर अज्ञातांनी फाडले - तणावपूर्ण वातावरण -...

सांगलीतील राम मंदिर चौकात श्रीरामाचे पोस्टर अज्ञातांनी फाडले – तणावपूर्ण वातावरण – संबंधितांवर कारवाईची नागरिकांची मागणी…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील राम मंदिर चौकात असणाऱ्या श्रीराम मंदिर रिक्षा मित्र मंडळाच्या निवार्यामध्ये लावण्यात आलेल्या श्रीरामाचे पोस्टर अज्ञाताकडून फाडल्याची घटना घडली.हा प्रकार लक्षात येताच आज हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिर चौकातील सर्व दुकाने बंद करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे राममंदिर चौकात तणावपूर्ण वातावरण होते.सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती वर नियंत्रण मिळवले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांना निवेदन देण्यात येऊन ज्याठिकाणी पोस्टर होते त्याच ठिकाणी दुसरे पोस्टर लावून त्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे,प्रसाद रिसवडे आदींसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: