Thursday, May 2, 2024
Homeराज्यरणजी करंडक संभाव्य क्रिकेट संघात सांगली जिल्ह्यातील दोन जणांची वर्णी...

रणजी करंडक संभाव्य क्रिकेट संघात सांगली जिल्ह्यातील दोन जणांची वर्णी…

Share

सांगली – ज्योती मोरे

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रीमियम लीग स्पर्धे मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पोलाईट स्पोर्ट्स क्लब च्या तरणजीत सिंग धील्लोन व विजय पावले या खेळाडूंची रणजी करंडक महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघांमध्ये निवड झाली आहे.

रणजी करंडक महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघांमध्ये निवड झालेबद्दल , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मा.संजयजी बजाज यांच्या हस्ते तरणजीत सिंग धील्लोन व विजय पावले यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दादा पवार चेअरमन सचिन मुळे व खजिनदार संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सदर खेळाडूंची निवड झाली आहे तसेच या खेळाडूंना पोलाईट स्पोर्ट्स क्लब चे राहुल आरवाडे, युसुफ जमादार, प्रितेश कोठारी, अमित फारणे ,चेतन पडियार, गणेश कुकडे ,विजय वावरे क धनंजय डुबल यांचे मागदर्शन लाभले


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: