Monday, May 6, 2024
Homeगुन्हेगारीजुगार खेळणाऱ्यांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त...

जुगार खेळणाऱ्यांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…

Share

आलेगाव येथे चान्नी पोलिसांची कारवाई

पातूर – निशांत गवई

पैशाच्या हारजीतवर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईत नगदी २४ हजार ७६० रुपये, ७७ हजार रुपये किमतीचे ०६ मोबाईल, १ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी असा एकूण २ लाख ३६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत सहा जुगारी पोलिसांच्या हाती लागले,ही कारवाई चान्नी पोलिसांकडून आलेगाव येथे रविवारी सापडा रचून करण्यात आली आहे.

१.शेख मोबीन शेख मुसा, २. यावर खान सनाउल्ला खान, ३.जफर खान सनाउल्ला खान, ४) अब्दुल अजहर जहिर,५) सैजाद खान इमदात खान, ६) मोहम्मद वसीम मोहम्मद फारुक सर्व रा.आलेगाव अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.

त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एकूण २ लाख ३६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यांच्या विरुद्ध जुगार कायद्यानुसार चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: