Saturday, May 4, 2024
Homeराज्यट्रूकने ३८ तासांच्या प्लेटाइमसह बीटीजी बीटा इअरबड्स लॉन्च केले...

ट्रूकने ३८ तासांच्या प्लेटाइमसह बीटीजी बीटा इअरबड्स लॉन्च केले…

Share

ट्रूक या उच्च दर्जाची ऑडिओ उत्पादने निर्माण करणाऱ्या भारतातील अग्रगण्य ऑडिओ ब्रॅण्डने त्यांचा अत्याधुनिक वायरलेस बीटीजी बीटा लॉन्च केला. बीटीजी (बॉर्न टू गेम) ट्रू वायरलेस इअरबड्स अॅमेझॉन व फ्लिपकार्ट, क्रोमा इत्यादींसारख्या विविध बाजारस्थळांवर १२९९ रूपयांच्या नियमित किंमतीत उपलब्ध असेल.

ट्रूकचा बीटीजी बीटा जवळपास ४० एमएसपर्यंतच्या बेस्ट-इन-क्लास अल्ट्रा लो लेटन्सीसह लाइफटाइम अनुभव देतो. बीटीजी बीटा संगीतप्रेमींना १३ मिमी टायटॅनियम स्पीकर ड्रायव्हर्सच्या माध्यमातून सिनेमॅटिक म्युझिक अनुभव देखील देतो. ट्रू वायरलेस स्टिरिओ (टीडब्ल्यूएस) इअरबड्स जवळपास ३८ तासांपर्यंत अद्वितीय प्लेटाइमसह एकाच चार्जमध्ये १० तासांचा प्लेटाइम देतात, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळापर्यंत संगीत ऐकण्याचा व गेमिंगचा आनंद घेऊ शकता.

ऑडिओफाइल्स त्वरित पेअरिंग आणि वैशिष्ट्य नियंत्रित करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम टॅपच्या माध्यमातून बीटीजी बीटाच्या सुधारित उपलब्धतेचा देखील आनंद घेऊ शकतील. ट्रू वायरलेस इअरबड्समध्ये ड्युअल-माइक एन्वहरोन्मेंटल नॉईल कॅन्सलेशन (ईएनसी) देखील आहे आणि ते क्लासिक केस डिझाइनसह येतात.

ट्रूक इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय म्हणाले, ‘‘ट्रूक बीटीजी बीटा इअरबड्समध्ये नवोन्मेष्कार व तंत्रज्ञान कौशल्याचे परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामधून वापरकर्त्यांच्या संगीत ऐकण्याचा व गेमिंगचा अनुभव अपग्रेड होण्याची खात्री मिळते. टीडब्ल्यूएस इअरबड्स किफायतशीर बाजारपेठ किंमतीमध्ये उल्लेखनीय, हाय-क्वॉलिटी वायरलेस ऑडिओ अनुभव देतील, ज्यामुळे हे इअरबड्स इतरांच्या तुलनेत वरचढ आहेत.

भारतीय टीडब्ल्यूएस क्षेत्र, तसेच वापरकर्त्यांच्या संगीत ऐकण्याच्या सवयींसंदर्भात आम्‍हाला अधिक वाढ होताना निदर्शनास आले आहे. भारतीय गेमिंग बाजारपेठेने यंदा २.६ बिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आणि २०२७ पर्यंत २७ टक्के सीएजीआर दराने ८.६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. देशभरातील मिलेनियल्स व जनरेशन झेड आनंद घेत असलेल्या म्युझिक कन्टेन्टवर इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामध्ये ही भर आहे.’’

या उत्पादनाचे लॉन्च सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्षमता, कार्यक्षमता, ग्राहक अनुभव व किफायतशीरपणाचे संयोजन असलेल्या दर्जात्मक उत्पादन ऑफरिंग्जसह साऊंड वेअर व सोनिक अॅक्सेसरीज क्षेत्रातील पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून स्थापित होण्याच्या ट्रूकच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: