Friday, September 22, 2023
Homeराज्यविद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणुकीत त्रिशा बोरकर विजयी…पवनी येथील जयसेवा आदर्श हायस्कुल येथे निवडणुक...

विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणुकीत त्रिशा बोरकर विजयी…पवनी येथील जयसेवा आदर्श हायस्कुल येथे निवडणुक संपन्न…

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

तालुक्यातील पवनी येथील जयसेवा आदर्श हायस्कूल येथे विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक घेण्यात आली. त्यात कु. त्रिशा श्रावण बोरकर ही विद्यार्थिनी विजयी झाली.

निवडणूक आयुक्त म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. दुर्गाताई सरियाम मॅडम यांनी तर सह आयुक्त म्हणून श्री. त्रिकाल सर, श्री. धोटे सर व श्री. बावनथडे सर यांनी काम पाहिले. ही निवडणूक भारतीय लोकशाही पद्धतीने घेण्यात आली. त्यात गुप्त मतदान पद्धतीने विद्यार्थ्यांनी मतदान केले. आपला प्रतिनिधी निवडला.

याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. लक्ष्मीकांत कळंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन मीनाकुमारी राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.आनंदराव वाडीवे, श्री. धर्मराज नागपुरे, श्री. प्रभुलाल कोकोडे, श्री. रविशंकर टेकाम व श्री. धनराज कामडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गावून समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: