Thursday, May 2, 2024
Homeराज्यरस्ते अपघातातील मृतांना श्रद्धांजलीसह अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींसह संस्थांचा सन्मान होणार -...

रस्ते अपघातातील मृतांना श्रद्धांजलीसह अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींसह संस्थांचा सन्मान होणार – ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संचालक बाळासाहेब कलशेट्टी…

Share

सांगली – ज्योती मोरे

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक आणि सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनानुसार रस्ते अपघातातील मृतांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली देत त्यांच्या नातेवाईकांचं मनोबल वाढवण्यासह अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करत रस्ता सुरक्षा नियमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस ,सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी आणि आभाळमाया फाउंडेशन आदींच्या सहकार्याने सांगलीतील पुष्पराज चौकामधील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सांगलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्लीचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी यांनी केले आहे.

त्याचबरोबर रस्ता सुरक्षितते संदर्भातील नियमांच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक चित्रफितही प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती कलशेट्टी यांनी दिली आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: