Sunday, May 5, 2024
Homeराज्यखाणीत टिप्पर पलटी झाला…वाहन चालक ठार… पोलीस तपास सुरू…

खाणीत टिप्पर पलटी झाला…वाहन चालक ठार… पोलीस तपास सुरू…

Share

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील पोपटखेड नजीक रुधाडी परिसरातील संतोष शेंडे यांचे खाणीतून गौण खनिज वाहून नेणारा टिप्पर पलटी होऊन त्या अपघातात वाहन चालक जबर जखमी झाला. त्याला उपचारार्थ आकोट ग्रामीण रुग्णालयात नेत असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

मृतकाचे नाव नित्य गोपाल बिस्वास असून तो पश्चिम बंगालमधील दत्तापाडा, नाडिया येथील रहिवासी आहे. वारुळा ते तेल्हारा मार्गाचे निर्माण कार्य करणाऱ्या सुधीर कन्स्ट्रक्शन कंपनीत तो काम करीत होता. या रस्ता निर्माणाकरिता तो गौण खनिज वाहून नेत होता. ही खबर मिळताच आकोट ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: