Friday, May 3, 2024
Homeराजकीयखामगाव नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे, अँड फुंडकरांनी केली कामाची पाहणी...

खामगाव नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे, अँड फुंडकरांनी केली कामाची पाहणी…

Share

खामगाव शहरासाठी होत असलेल्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास जात असून जात असून आज या कामाची भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकरांनी पाहणी केली. खामगाव शहरासाठी शिरला नेमाने प्रकल्पातुन होत असलेल्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

आज आ अँड आकाश फुंडकर यांनी आवार नजीक पाईप जोडणी कामाची पाहणी केली. यावेळी आ अँड फुंडकर यांनी उर्वरित काम युद्धस्तरावर करून संपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. लवकरच या योजनेचे माध्यमातून शहरवासीयांना पाणी मिळेल अशी आशा यावेळी आ अँड फुंडकरांनी व्यक्त केली आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी उपस्थित होते.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: