Friday, September 22, 2023
Homeराज्यनांदेड शहर व जिल्ह्यात गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद...

नांदेड शहर व जिल्ह्यात गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद…

नांदेड – महेंद्र गायकवाड

गणेशोत्सव विसर्जन मार्गात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूक मार्गात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे यादृष्टीकोणातून नांदेड शहर व‍ जिल्ह्यात शुक्रवार 9 सप्टेंबर 2022 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत.

मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत. आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 10 सप्टेंबर 2022 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: