Friday, May 17, 2024
Homeविविधमूर्तिजापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री विनायकराव नवघरे याचं दुःखद निधन...

मूर्तिजापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री विनायकराव नवघरे याचं दुःखद निधन…

Share

मूर्तिजापूर : शहरातील स्टेशन विभागातील, श्री गाडगे महाराज विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक, श्री विनायकराव मोतीरामजी नवघरे (वय 79)यांना आज दुपारी दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली. शहरात त्यांनी गेल्या 40 वर्षापासून आपल्या कलाअविस्काराने गणपती देखावा सादर करून अवघ्या तालुक्यात नावलौकिक मिळविले.

गणेश उत्सव दरम्यान केलेल्या विविध देखाव्यातून ते समाज प्रबोधन करीत असत सोबतच राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा वर्धाचे ज्येष्ठ प्रचारक होते, त्यांचे अनेक विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर रोजी ११ वाजता त्यांचे निवास स्थानावरून सुभाष चौक,स्टेशन विभाग येथून निघणार आहे .मुर्तीजापुर तालुक्यामधून राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी प्रविष्ट करून राष्ट्रभाषेचा प्रचार, प्रसार करणारा एक महान प्रचारक,योध्दा गेल्याने परिसरात दुःख पसरले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: