Sunday, May 12, 2024
Homeराज्यवैद्यकीय महाविद्यालयाचे खरे श्रेय खासदार प्रफुलभाई पटेलानाच : माजी आमदार राजेंद्रजी जैन...

वैद्यकीय महाविद्यालयाचे खरे श्रेय खासदार प्रफुलभाई पटेलानाच : माजी आमदार राजेंद्रजी जैन…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सर्व सुविधायुक्त आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी सन २०१० पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली जात होती. नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी अति गरजेचे असलेले वैद्यकीय महाविद्यालय गोंदियात सुरू व्हावे, या दृष्टीकोनातून खासदार प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले.

दरम्यान राज्य व केंद्र शासनाकडे कसोसीचे प्रयत्न केल्याने गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी मिळाली. एवढेच नव्हेतर महाविद्यालय फक्त सुरू व्हावे, एवढ्यावरच न थांबता प्रशस्त इमारत आणि इतर तांत्रिक बाबीच्या पुर्ततेसाठी खासदार प्रफुल पटेल यांचे प्रयत्न सुरूच राहिले.

परिणामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी १५० विद्यार्थी डॉक्टर तर ५५ डॉक्टर उच्चशिक्षण घेत आहेत. आज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशस्त इमारतीचे प्रश्न मार्गी लागले असून भुमिपूजन सोहळाही पार पडत आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने खासदार प्रफुल पटेल यांनाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे श्रेय जात आहे. हे सर्वश्रुत असले तरी सर्वसामान्य नागरिक देखील खासदार प्रफुल पटेल यांनाच श्रेय देत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सन २०१० पासून खा.प्रफुल पटेल यांचा सुरू असलेला पाठपुराव्याने गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी मिळाली. गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी पुरतेच न थांबता खा.प्रफुल पटेल हे महाविद्यालयाला सुसज्ज अशी स्वतंत्र इमारत मिळावी, यासाठी सतत प्रयत्न करीत राहिले.

दरम्यान सन २०१२-१३ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा इमारतीसाठी ११३ कोटी मंजूर करवून निधी उपलब्ध करून घेतला. मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इमारत बांधकामाला गती मिळाली नाही. असे असले तरी इमारत बांधकामाची प्रक्रिया पुढे सरकली नाही. यात येणार्‍या अडी-अडचणी मार्गी लावण्यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी कसलेही राजकारण न करता पुढाकार घेतला.

दरम्यान राज्य शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी ६८९ कोटीचा निधी मंजूर करवून घेतला. त्यामुळे वर्षांनुवर्षापासून प्रलंबित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला गती मिळाली. उद्या (त.११) उपराष्ट्रपती जगदिप धनखड व राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भुमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु, आता श्रेय लाटण्यासाठी काही जनप्रतिनिधी डोके उंचावत आहेत.

असे असले तरी खर्‍या अर्थाने खासदार प्रफुल पटेल यांनाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी, तांत्रिक अडचणींची सोडवणूक, इमारत बांधकामासाठी लागणारा निधी खेचून आणणे, नियोजित जागेचा तिढा सोडविणे या सर्व बाबीत खासदार प्रफुल पटेल यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे खासदार प्रफुल पटेल यांचे जनसामान्यांकडून आभार मानले जात आहे


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: