Sunday, May 5, 2024
Homeविविधविद्या मंदिर,उजळाईवाडीच्याशाळेची प्रगती कौतुकास्पद...आशा उबाळे 

विद्या मंदिर,उजळाईवाडीच्याशाळेची प्रगती कौतुकास्पद…आशा उबाळे 

Share

लोक सहभागातून शाळेचा चेहरामोहरा बदलला

कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र ढाले

लोकसहभागातून आकारात येत असलेल्या प्राथमिक विद्या मंदिर,उजळाईवाडी (ता.करवीर) या शाळेची झालेली प्रगती कौतुकास्पद आहे. येथे लोक सहभागमुळे शाळेचे रुपडे पालटत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासा बरोबर तंदुरुस्तीसाठीही सही पोषण देश रक्षण या आरोग्य विषयक उपक्रमाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद कोल्हापुरच्या प्राथमिक शिक्षणअधिकारी आशा उबाळे यानी केले.

त्या प्राथमिक विद्या मंदिर,उजळाईवाडी (ता.करवीर ) मार्फत आयोजित पोषण सप्ताह,रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा माने होत्या.

यावेळी पोषण आहारच्या अधिक्षीका सौ.वसुंधरा कदम,विस्तार अधिकारी टी. ए.  पाटील,गटशिक्षण अधिकारी समरजित पाटील,आनंदराव अकुर्डकर,मुख्याध्यापक याकुब ढोले, सरपंच सुवर्णा माने,तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन पाटील,ग्रा.प.सदस्य बाबासाहेब माने,शकील नदाफ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता फडतारे ,शिक्षक रोहिणी शिंदे,सुचिता विभूते,संगीता चांदणे,मंदाकिनी घोंगडे, धनश्री शिंदे सर्व शिक्षक ,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.मुख्याध्यापक याकुब ढोले यानी प्रास्ताविक यांनी केले. संयोगीता महाजन यानी सूत्र संचालन  केले तर अतुल सुतार यानी आभार मानले. 


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: