Thursday, May 2, 2024
Homeराज्यराष्ट्रीय आदर्शच्या निसर्गदूतांनी वाचवला सुगरणीचा जीव...

राष्ट्रीय आदर्शच्या निसर्गदूतांनी वाचवला सुगरणीचा जीव…

Share

रामटेक – राजु कापसे

राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे नवव्या वर्गात शिकणारा वसतिगृहात राहणारा कुणाल कोकोडे हा ४ एप्रिलला सायंकाळी साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानात जाताना नजीकच्या अशोक राऊत यांच्या घरासमोर सुगरण पक्षाचे पिल्लू पडलेले दिसले.

सायंकाळची वेळ आणि रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असल्याने पिल्लाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून त्याने उचलून वस्तीगृहात आणले. त्याला आहारात भाताची शिते आणि पाणी दिले. प्रणय आरसे, कुणाल कोकोडे, अनुष मेश्राम, काव्या भोतमांगे, आयुष गुरभेले, संदीप टेकाम, आरव मेश्राम, पंकज धुर्वे यांनी त्याला राहण्यासाठी सुंदर असे सुरक्षित घरटे तयार केले.

पण त्याची योग्य काळजी कशी घ्यायची याबद्दल ते अनभिज्ञ होते त्यामुळे सकाळी शाळेत येताना सुगरणला घरट्यासह शाळेतच घेऊन आले आणि घडलेली सगळी हकीकत राष्ट्रीय हरित सेनेचे संयोजक शिक्षक साक्षोधन कडबे यांना सांगितली. राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळाचे सचिव मयंकराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली साक्षोधन कडबे यांनी लगेचच टीटीसी सेंटर नागपूरचे समन्वयक कुंदन हाटे यांचेशी भ्रमणध्वनी द्वारा संपर्क साधून सुगरण वरील पुढील उपचाराची प्रक्रिया जाणून घेतली व मुलांना समजावून सांगितली.

त्यानुसार ‘मेलेले गांडूळ, थोडे साखरयुक्त पाणी’ असा त्याचा आहार सुरू करण्यात आला असून तो आता सुस्थितीत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानामुळे पक्षांचे जखमी होणे व मृत्यूच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे निसर्गातील एक महत्त्वाचा घटक म्हणून पक्षांच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवाहन कडबे यांनी केले.

याप्रसंगी शाळेचे शिक्षक नीलकंठ पचारे, अमित मेश्राम शिक्षकेतर कर्मचारी राशीद शेख तसेच इयत्ता आठवी व नववीचे निसर्गदूत दिपांशू पंधराम, अंशुल तुपट, प्रणय आरसे, रोहित मुंगभाते, वैभव सहारे, अनिकेत पुरकाम, सारंग भलावी, सक्षम सोनेकर, प्रणव ढोंगे, आयुष ढोरे, वंशिका सावरकर, भुवनेश्वरी शेंडे, समीक्षा सोनटक्के, वंशिका ठाकरे,

प्रतीक्षा वारकर, अंजली कळमकर, आर्यन कोडवते, सारंग सहारे, सौरभ सहारे, ऋतिक धुर्वे, हर्ष डोंगरे, रोहन बांबोडे, आर्या ढोरे, सिमरन राऊत, सलोनी भागडकर, किरण पारधी, खुशी खंडाळे, रुचिका धुर्वे, सिखा सिंदराम, अंजली कोरचे, अपेक्षा कोरचे, सेजल कळमकर, आरुषी भागडकर, प्रतीक्षा तुपट, समीर काळसर्पे, विकेश कोरचे, दुर्गेश राऊत, आसिफ पठाण, सुरज कुत्तरमारे, साहिल कोकोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदूळकर, शैलेंद्र देशमुख, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, प्रा. अरविंद दुनेदार, प्रा. सुनील वरठी व शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद कोठेकर, लिलाधर तांदूळकर, मोरेश्वर दुनेदार यांचे सहकार्य लाभले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: