Saturday, May 4, 2024
Homeराज्यशिक्षकांच्या परिश्रमातूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तम होईल - शैलेश जोशी...

शिक्षकांच्या परिश्रमातूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तम होईल – शैलेश जोशी…

Share

विद्या भारती तर्फे अहेरीत शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न

अहेरी येथील स्थानिक मॉडेल स्कूल मध्ये शैक्षणिक धोरणाची कार्यशाळा घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रोहनकर , तर प्रमुख वक्ते म्हणून विद्या भारती चे विदर्भ व देवगिरी प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी होते.

या कार्यक्रमात विविध शाळेतील शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लगेचच करण्यात येण्याची आशा आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा समजून घ्यावा. भारत केंद्रित शिक्षणाचे हे धोरण असून पुढील पिढी भारताच्या योग्य इतिहासाची जाण असणारी आणि त्यामुळे देशाप्रती मनात गौरवभाव असणारी घडावी यासाठी तयार करण्यात आले आहे.

शिक्षकांनी ह्या धोरणामागील भाव समजून घ्यावा. शिक्षकांच्या परिश्रमातूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तम होईल असे प्रतिपादन विद्या भारतीचे विदर्भ व देवगिरी प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी यांनी केले. स्थानिक मॉडेल स्कूल येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रमोद रोहणकर व्यासपीठावर उपस्थित होते.

पायाभूत शिक्षण आणि पूर्वतयारी गटाचे शिक्षण मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत व्हावे हा आग्रह धोरणात आहे याचाही त्यांनी उल्लेख केला. शिशु शिक्षणात मातृभाषेतून शिक्षण झाले तर आकलन चांगले होते असेही ते व्यासपीठावरून बोलत होते. धोरणातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण याप्रसंगी त्यांनी केले.

कार्यशाळेसाठी परिसरातील संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्ग राजा बहुउद्देशीय संस्था भंगाराम तळोदीचे अध्यक्ष चेतन आईचवार, विद्या भारती चंद्रपूर जिल्हा मंत्री सुभाष त्रिपाठी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गडचिरोली जिल्हा मंत्री विजय सुंकेपाकवार यांनी केले. शांती मंत्राने कार्यशाळेची सांगता झाली. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मॉडेल स्कूल अहेरी, कै. चंद्रभागाबाई मद्दीवार विद्यालयाच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: