Thursday, May 9, 2024
Homeराज्यमहामार्गावर मुख्य हायवेच्या साईट पट्ट्यावर मोठे बोर्ड वाहन  चालकांची डोकेदु:खीत वाढ :-...

महामार्गावर मुख्य हायवेच्या साईट पट्ट्यावर मोठे बोर्ड वाहन  चालकांची डोकेदु:खीत वाढ :- अपघाताला आमंत्रण…

Share

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य हायवेच्या साईट पट्ट्यावर हॉटेलचे मोठे बोर्ड लावल्याने व थांबलेली अवजड वाहने दु-चाकी चालकांची डोकेदु:खी बनत आहेत.महामार्गावर लावलेले हे बोर्ड त्वरित काढून घेण्याची विनती करूनही रस्ते वाहतूक यंत्रणा व हॉटेल चालक यांच्या मध्ये मिलीभगत असल्याने या बोर्ड मुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

तसेच थांबलेल्या अवजड वाहने सर्व्हिस रोड वरून हटवण्याची नितांत गरज असून महामार्ग देखभाल दुरुस्ती व पेट्रोलिंग विभाग तसेच महामार्ग पोलिसांनी त्वरित दखल घेऊन रस्त्यावर थांबलेल्या अवजड वाहनांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

मुसळधार पावसामुळे महामार्गावरील 

रस्त्याच्या साईटपट्ट्याही खचल्या आहेत.दलदल व खड्डेमय  खड्ड्यातूनचं वाहन धारकांना जावे लागते. दु-चाकी चालकांनी सर्व्हिस रोडचा वापर करावा असे  नामफलक दिसत आहेत.पण सर्व्हिस रोडवरही मोठं मोठे खड्डे पडल्याने दुचाकी वाहन चालकाना  हायवेवरूनच ये- जा करावी लागते.यामुळे दुचाकी चालक वाहने  साईटपट्ट्यावरून हायवेवर घेताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांना धडकला जात असून मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील 

सर्व्हिस रोड सुस्थितीत नाहीत. खड्डेमय साईटपट्टीवर लावलेले नामुष्की जन्य माहिती फलक वाहनधारकासाठी चेष्टेचा विषय बनत आहेत.एक तर हे नामफलक हटवावेत अथवा रस्त्याच्या साईटपट्ट्या दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी वाहनधारकामधून होत आहे.

हायवे वरून कागलकडे येताना बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस रोड नाही.त्यामुळे वनवे वाहने येतात.वनवे वाहनांमुळे सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होतात.,उचगाव हॉटेल सूर्यदीप समोरचा रस्ता,उजळाईवाडी ट्रॅफिक पोलीस मदत केंद्राच्या उजव्या वाजू पासून ते तडका हॉटेल पर्यत कुठंच सर्व्हिस रोड नाही.त्यामुळे अवजड वाहने रस्त्यावर थांबलेली असतात .

चौकट: महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या डाव्या बाजूला गोकुळ शिरगाव कडे जाताना महालक्ष्मी   नगर लागते.या ठिकाणच्या लोकांना वनवे पध्द्तीने उजळाईवाडीत दळप काडप करण्यासाठी,मुलांना शाळेत सोडण्यासाठी व किरकोळ कारणासाठी ये -जा करावी लागते.त्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते. यामुळे उजळाईवाडी क्रांती चौक ते महालक्ष्मी नगर सर्व्हिस रोड करण्यात यावा.

फोटो ओळ: पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर सर्व्हिस रोडवर मयूर पेट्रोल पंप हायवे बिर्ज ते उजळाईवाडी महालक्ष्मी नगर पर्यंत हायवे रस्त्याच्या सर्व्हिस रोड वर हॉटेल चे मोठे बोर्ड लावल्याने वाहनाच्या अपघाताची शक्यता आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: