Sunday, April 28, 2024
Homeसामाजिकगडमंदीरावर काकड आरतीसाठी भाविकांची अलोट गर्दी "जय श्रीराम" च्या जयघोषाने दुमदुमतो गडमंदीर...

गडमंदीरावर काकड आरतीसाठी भाविकांची अलोट गर्दी “जय श्रीराम” च्या जयघोषाने दुमदुमतो गडमंदीर परिसर…

Share

  • नागपुरचा ढोलताश्याचा गजर
  • पहाटे ५ वाजता काकडा आरतीला भाविकांची आवर्जुन हजेरी
  • लक्ष्मीपुजनच्या दिवशी असते हजारोंच्या संख्येत गर्दी

रामटेक – राजू कापसे

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रख्यात रामनगरीतील श्रीराम गडमंदिरवर दरवर्षी प्रमाने कोजगिरिच्या दुसऱ्या दिवसी काकडा आरतीला सुरुवात झाली. काकडा आरती नियमीत सकाळी 5 वाजता होते. त्यापूर्वी सकाळी 4.30 वाजता भजनाला सुरुवात होते. तत्पूर्वी ४ वाजतापासुनच भावीक येथे येत असतात. दरम्यान नुकताच येथे काकडा आरती निमिताने नागपुर येथील शिवमुद्रा ढोल ताशा व ध्वज पथकाने सकाळी 6 ते 7 पर्यंत ढोलताश्याचा जोरदार गजर केला.

विशेष म्हणजे काकड आरतीसाठी परिसरातील मानापूर, मनसर, चिचाळा , रामटेक , शितलवाडी सहीत अनेक गावातील लोक सकाळी 5 वाजता उपस्थित होतात. गड़मंदिरला 1700 वर्षाचा इतिहास आहे. गडमंदिर परिसरात काकड आरतीसाठी महीला, पुरुष, युवक-युवती व लहान मुले मोठ्या संख्येने येतात. राम मंदिरात मोहन पंड़े व लक्ष्मण मंदिरात धनंजय पंडे सहीत आदि पुजारी आरती करतात. उपविभागीय अधिकारी व मंदिर रिसीवर वंदना सवरंगपते यांच्या मार्गदर्शनात अनेक उपक्रम होतात.

यावेळी गडमंदीराचे निरिक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर हे आपल्या सुरक्षा जवानांसह काकड आरतीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवत असतात. ‘ जय श्रीराम ‘ च्या गजराने दुमदुमतो गडमंदीर परिसर गडमंदीरावर पहाटे ५ वाजता दरम्यान होणाऱ्या काकड आरतीसाठी रामटेक शहर तथा लगतच्या काही गावांमधुन मोठ्या संख्येने भावीक, भक्तगण येत असतात. दिवसेंदिवस त्यांची संख्या एवढी वाढते की सुरक्षा रक्षकांची गर्दी सांभाळतांना मोठी दमछाक होत असते.

येणारे भाविक भक्तगण एकमुखाने ‘ जय श्रीराम, जय जय श्रीराम ‘ चा जयघोष करीत असतात. दरम्यान पहाटे ४ ते ५.३० हा दिड तासाचा कालावधी या जयघोषाने अक्षरश: दुमदुमुन जात असतो. ढोलताशा पथकाचे उत्कृष्ट संचालन नुकताच येथे काकडा आरती निमिताने नागपुर येथील शिवमुद्रा ढोल ताशा व ध्वज पथकाने सकाळी 6 ते 7 पर्यंत ढोलताश्याचा जोरदार गजर केला. पथकामध्ये 150 लोकांचा समुह होता. त्यात 12 वर्षा वरील युवक-युवती ते 65 वर्षा पर्यंत महिला व पुरुषांचा सहभाग होता.

पथकाचे संचालन जय आस्कर, पराग बागड़े , आमित पांडे यानी केले. ते म्हणाले की सकाळी 6 वाजता गडमंदिरावर पोहचून ढोल ताश्याचा गजर कण्यात अत्यानंद झाला. पथकामधे विद्यर्थि, नौकरी व व्यवसाय करणारे लोक होते. पथक कार्यक्रमासाठी रात्रभर जागला. अवजड ढोल गडमन्दिर वर पायऱ्याने नेने व परत आनने अवघड कार्य होते. ते पथकातील लोकानी केले. काकडा आरती ला येणाऱ्या भक्तांनी पथकाचे कौतुक केले. काकड आरती भक्त परिवार, प्रकाश कस्तूरे व डॉ निनाद पाठक यांनी ढोलताशाच्या यशश्वीतेसाठी प्रयत्न केले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: