Friday, May 17, 2024
Homeराज्यश्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वाडेगाव येथे पार पडला अंतिम सामना...

श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वाडेगाव येथे पार पडला अंतिम सामना…

Share

प्रदेशाध्यक्ष मा. निलेशजी विश्वकर्मा यांच्या हस्ते विजेता संघाला पारितोषिक व चषक

श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वाभिमान सप्ताह अंतर्गत दि. १० मे २०२३ ते १४ मे २०२३ पर्यंत “श्रध्देय श्री अॅड बाळासाहेब आंबेडकर चषक वाडेगाव २०२३” चे डे-नाईट टेनिस बॉल खुले क्रिकेट सामन्यांचे आयोजन लहरी क्रिडा व सांस्कृतिक मंडळ वाडेगावच्या वतीने मुख आयोजक श्री. गोपाल प्रकाशराव राऊत यांनी आयोजित केले होते.

सतत ५ दिवस चाललेल्या या स्पर्धेत बहुजनांचे दिपस्तंभ, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय श्री. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती तसेच या सामन्याचा टॉस हा श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. अंतिम सामना हा के. जी. एन. नागपूर व झकवान रायडर बाळापूर यांच्यात खेळण्यात आला.

यात के. जी. एन. नागपूर या संघाने बाजी मारत प्रथम पारितोषिक व चषकावर आपल्या संघाचे नाव कोरले. सामन्यात प्रथम विजयी संघाला सामाजिक कार्यकर्ते किशोर वानखडे यांच्या तर्फे २ लक्ष ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक तसेच उपविजयी झकवान रायडर बाळापूर संघाला शिक्षक आशिष तिकांडे सर यांच्या तर्फे १ लक्ष ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक असे बक्षिस वितरण वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष मा. निलेशजी विश्वकर्मा यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

या स्पर्धेत जागतिक टेनिस बॉल क्रिकेटर कृष्णा सातपुते हे विशेष आकर्षण म्हणून उपस्थित होते. सोबतच आद. अमन आनंदराज आंबेडकर व क्रिकेटर कृष्णा सातपुते यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत धुवेदार बल्लेबाजी केली. ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, युवा आयकॉन मा. अमन आनंदराज आंबेडकर, मुख्य आयोजक‌ गोपाल राऊत,

पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंदजी भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, ओबीसी नेते अॅड. संतोष राहाटे, जि. प. उपाध्यक्ष सुनिल फाटकर, राहुल प्रकाशराव राऊत, माजी सभापती आकाश शिरसाट, जि. प. सदस्य राम गव्हाणकर, डॉ. अनिल अमलकार, कश्यप जगताप, राहुल अहिरे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, माजी मनपा गटनेते गजानन गवई, मनोहर पंजवानी, डॉ. निलेश उन्हाळे, मुश्ताक शहा, धनंजय दांदळे, निलेश इंगळे, गोपाल ढोरे, रामकृष्ण सोनटक्के,

डॉ. ओमप्रकाश धर्माळ, आशिष वानखडे, पहेलवान झाकिर शेख, मोहित बगडिया, सुजित तेलगोटे, सम्राट तायडे, मंगेश गवई, अमोल कलोरे, सनाउल्ला शहा, रूपेश जंजाळ आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. संपूर्ण सामन्यांचे उत्कृष्ट सुत्रसंचलन आर.जे. ओम व आर. जे. भुषण यांनी केले तर या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सर्व करण्यात आल्याने वाडेगाव येथील सामने लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो क्रिकेट प्रेमींनी पाहले.सोशल मिडीया. वृतपत्र मध्ये प्रसिद्धि साठी डां. शेख चांद .सुमेध अंभोरे,

निखील जढाळ, यांनी सहकार्य केले. या सामन्यांच्या यशस्वीतेसाठी राहुल लोध, अजित लोध, करण लोध, शैलेश लोध, नितीन शेंगोकार, आकाश वानखडे, आकाश पळसकार, निहाल परमेश्वर, कुणाल मसने, वैभव पाचपोर, रोहित खंडारे, गणेश चिंचोळकार, प्रवीण भटकर, मनीष येवले, गणेश ठोंबरे, प्रवीण राऊत, राहुल इंगळे, अतुल कळंब, मेहुल इंगळे, राजेश्वर पळसकर यांच्यासह लहरी क्रिडा व सांस्कृतिक मंडळ वाडेगाव तथा राजे संभाजी महाराज मंडळ. नैशनल क्रिकेट मंडळ वाडेगावच्या वतीने अथक परिश्रम घेण्यात आले.

दि. १२ मे २०२३ ला खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पि. जे. वानखडे, तहसिलदार राहुल तायडे, मुख्य आयोजक गोपाल प्रकाशराव राऊत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे जि. प. अध्यक्ष सौ संगीताताई अढावू, अॅड संतोष राहाटे, जि. प. उपाध्यक्ष सुनिल फाटकर,

जि. प. शिक्षण सभापती सौ मायाताई नाईक, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य सौ. पुष्पाताई इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगर, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, जि. प. सदस्य विनोद देशमुख, सुषमाताई सरकटे, माजी जि. प. सदस्य संजय बावणे, विकास सदांशिव, माजी गटनेते गजानन गवई,

सौ. प्रतिभाताई अवचार, किशोर जामनिक, दिनकरराव खंडारे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे अॅड. प्रशिक मोरे, बाळापूर पं. स. सभापती सौ. राजकन्या सोनटक्के, किशोर जामनिक, दिनकर खंडारे, मंदा शिरसार, देगाव सरपंच सौ. दिपाली सरदार, आयुष्यमान मेश्राम, रमेश गवई गुरुजी, समाधानजी जगताप साहेब, आनंद खंडारे, आतिश शिरसाट आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

दि. १३ मे २०२३ ला खेळल्या गेलेल्या सामन्या दरम्यान युवा आयकॉन मा. अमन आनंदराज आंबेडकर, श्रीमती उषाताई प्रकाशराव राऊत, मा. राहुलभाऊ प्रकाशराव राऊत, मुख्य आयोजक मा. गोपाल प्रकाशराव राऊत, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंदजी भिरड, सौ. विजयाताई बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते अॅड संतोष राहाटे, सौ. तेजस्विनीताई संतोष राहाटे,

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. प्रतिभाताई भोजने, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, माजी सरपंच सौ. वैशाली विकास सदांशिव, नगरसेविका सौ‌. किरणताई बोराखडे, महानगर महासचिव सौ. सुवर्णाताई जाधव, पातुर तालुकाध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ, प्रसिद्धी प्रमुख दिनेश गवई, श्यामलाल लोथ, सौ. मायाताई श्यामलाल लोथ, किशोर वानखडे, आशिष तिकांडे, पैलवान झाकिर शेख, शिक्षक आशिष तिकांडे सर, पंकज मोहोळ, सुमेध अंभोरे आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: