Thursday, May 2, 2024
HomeMarathi News Todayचालक छत्री घेऊन चालवतोय बस...अहेरी आगारातील बसचा दुसरा व्हिडिओ...

चालक छत्री घेऊन चालवतोय बस…अहेरी आगारातील बसचा दुसरा व्हिडिओ…

Share

गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा आणि एका हातात स्टेरिंग आणि एका हातात वायफर फिरवत असलेला बसचा व्हिडिओ राज्यभर तुफान गाजलेला असताना या आगाराचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बस मध्ये छत्री घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. असे अनेक प्रकार अहेरी आगारात घडत असतानाही राज्य सरकार मात्र या आगाराला नवीन बस गड्यात पुरवण्यात दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

एकीकडे राजकीय मंडळी गडचिरोलीत विमानतळ उभारण्याच्या बाता करत असल्या तरी गडचिरोलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे चित्र आहे…


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: