Thursday, May 2, 2024
Homeराजकीयमनसे रामटेक तालुका अध्यक्षपदी सेवक बेलसरे यांची नियुक्ती...

मनसे रामटेक तालुका अध्यक्षपदी सेवक बेलसरे यांची नियुक्ती…

Share

रामटेक – राजू कापसे

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते अविनाशदादा जाधव व संदीपदादा देशपांडे यांनी नुकतीच २० व २१ जून २०२३ ला रविभवन नागपूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यात सेवक सितारामजी बेलसरे यांची मनसे रामटेक तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सेवक बेलसरे यांच्या नियुक्तीने रामटेक तालुक्यातील आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात असून रामटेक तालुक्यात मनसे पक्ष वाढीचे कार्य यापुढे जोमाने होण्याची दाट शक्यता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे.

यावेळी उपस्थितांमध्ये मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले, माजी मनसे तालुकाध्यक्ष अनिल मुलमुले, रतन वासनिक, जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे, मनोहर भगत, मुन्नाजी ओझा, प्रफुल पुसदेकर, मयूर तळेगावकर, अमित बहादुले , राकेश चौरे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी सेवक बेलसरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: