Saturday, May 4, 2024
Homeराज्यसुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत...

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मेजर नानासो यशवंत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सुरज फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी नवनवीन उपक्रम राबवले जात असतात.

त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्ट निमित्त यावर्षी अभ्यासक्रमात आर्टिफिसिअल इंटिलिजन्स हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे.त्यासाठी ए, आय क्लब सिलिकॉन व्हॅली अमेरिका त्याचबरोबर करार झाला आहे. त्याचबरोबर सुरज फाउंडेशन नव कृष्णा व्हॅली स्कूल यांच्या मार्फत स्टुडन्ट टाक हे स्वतंत्र यू ट्यूब चैनल सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती डॉक्टर यशवंत तोरो यांनी दिली.

या या संस्थेच्या शाळांनी 1994 पासून घडवलेले अनेक विद्यार्थी पोलीस, आर्मी ,वनरक्षक, एअर फोर्स अशा विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. शाळेचे असणारे ऋणानुबंध जोपासत शाळेचा माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी अनुप कामत हे अमेरिकेमध्ये मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत असून त्यांनी सुरज फाउंडेशन या संस्थेला एक लाख रुपये ची देणगी दिली.

नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रवीण लुंकड यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव एन. जी कामत, चेअरमन डॉ.यशवंत तोरो संचालिका प्राचार्य , संगीता पागनीस, मा अधिकराव पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम,

मा प्रशांत चव्हाण उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम, मा रघुनाथ सातपुते ऍडमिनिस्टेटिव्ह ऑफिसर, विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी, मा बन्सीकाका ओस्तवाल संचालक नव कृष्णा व्हॅली स्कूल कमिटी, मा.राजेंद्र पाचोरे विभाग प्रमुख एन क्रिश,मा श्रीशैल मोटगी अकाउंट इन्चार्ज, मा संतोष बैरागी इन्चार्ज नव कृष्णा व्हॅली गुरुकुल विभाग, हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मा प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्ञानदेव कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री अधिकराव पवार, मुख्याध्यापक नव कृष्णा व्हॅली स्कूल यांनी मांनले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: