Homeराज्यआ.अँड. फुंडकरांनी केला पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वाहतूक कंत्राट निविदा प्रक्रियेचा भांडाफोड...

आ.अँड. फुंडकरांनी केला पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वाहतूक कंत्राट निविदा प्रक्रियेचा भांडाफोड…

Share

चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची दिली ना. भुजबळांनी ग्वाही

खामगाव – हेमंत जाधव

आपल्या मर्जीतील मागील कंत्राटदारालाच कंत्राट मिळावे यासाठी वेळोवेळी अटी व शर्ती बदलल्या अश्या पुरवठा विभागाच्या जिल्हानिहाय अन्नधान्य वाहतूक कंत्राट निविदा प्रक्रियेचा आ.अँड. आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात भांडाफोड केला. त्यांच्या मागणीनंतर ना. छगन भुजबळ यांनी तातडीने चौकशी करून त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची ग्वाही दिली.

नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवठा विभागाच्या वाहतूक अन्नधान्य प्रक्रियेच्या या गंभीर विषयावर आ. अँड. आकाश फुंडकर यांनी लक्षवेधी मांडली व विधिमंडळाचे लक्ष वेधले. लक्षवेधी मांडताना या संपूर्ण निविदा प्रक्रियेचा त्यांनी भांडाभोड केला.

लक्षवेधी मांडताना ते पुढे म्हणाले की जिल्हानिहाय वाहतूक कंत्राट निश्चिती करण्यासाठी पुरवठा विभागाने मागील कंत्राटदारांची साखळी तयार केली. व चढ्यादराने कंत्राट प्रदान करण्यासाठी आधीचा प्रचलित शासन निर्णय बदलला. आपल्या मर्जीतल्या त्याच जुन्या कंत्राटदारांना कंत्राट मिळावे यासाठी त्यांचे सोयीच्या जाचक अटी व शर्ती त्यामध्ये समाविष्ट केल्या. त्यामुळे इतर नव्या कोणत्याही कंत्राटदाराला कंत्राट मिळणार नाही यासाठी त्यांनी ही व्यवस्था निर्माण केली.

तसेच वाहन क्षमते संदर्भात दोन वेगवेगळ्या तरतुदी केल्या. याचे उदाहरण देताना आ. अँड फुंडकर यांनी सिल्वर रोडलाईन्स या मागील कंत्राटदाराचा दाखला दिला. सोयीच्या केलेल्या या निविदा प्रक्रियेमुळे याच कंत्राटदाराला तब्बल यवतमाळ चंद्रपूर अमरावती व बुलढाणा या चार जिल्ह्याचे कंत्राट पुन्हा मिळाले.

तसेच कंत्राट मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत वाहन क्षमतेसंदर्भात बद्दल पूर्तता करण्याचे असताना सुद्धा आता दोन महिने उलटले तरीसुद्धा यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून त्याच कंत्राटदारांना कंत्राट मिळावे यासाठी केलेले निविदा प्रक्रिया रद्द करावी, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, व याची चौकशी करावी अशी मागणी आ. अँड . फुंडकर यांनी विधिमंडळात रेटून धरली.

त्याला उत्तर देताना तातडीने या या गंभीर प्रश्नाची चौकशी करून कंत्रालदाराला काळ्या यादी टाकण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली.आ. अँड. आकाश फुंडकर यांनी मांडलेल्या या लक्षवेधीमुळे राज्यात व बुलढाणा जिल्ह्या पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: